AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांमध्ये उत्साह बळजबरीने आणता येत नाही; निष्ठा…रोहित पवारांचा दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला टोला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

लोकांमध्ये उत्साह बळजबरीने आणता येत नाही; निष्ठा...रोहित पवारांचा दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2022 | 1:34 PM
Share

मुंबई :  दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांकडून एकोमेंकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. अखेर बुधवारी बीकेसीवर (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडला.  यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, मात्र किल्ला अभ्यद्य असल्याचं सिद्ध झालं. निष्ठा जिंकली अशा अशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार यांनी लागोपाठ दोन ट्विट करत शिंदे सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखादा-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते ,जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली’.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झालं’

कोणाच्या मेळाव्याला किती कार्यकर्त्यांची उपस्थिती?

शिंदे गटाचा आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  अखेर मुंबई पोलिसांकडून याबाबतची अंदाजे आकडेवारी जारी करण्यात आली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या मेळाव्याला दोन लाख तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला एक लाख एवढी गर्दी होती.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट