पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार, मोठ्या बदलांचे रोहित पवारांचे संकेत; आता पक्षात…

राष्ट्रवादी (शरद पवार ट) पक्षाचे नेते तथा आमदार शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात राष्ट्रवादी पक्षात मोठे बदल होणार आहेत, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार, मोठ्या बदलांचे रोहित पवारांचे संकेत; आता पक्षात...
rohit pawar and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 4:28 PM

NCP Party And Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानपरिषद निवडणूक लक्षात घेता अनेक नेत्यांनी पक्षबदल केला आहे. दरम्यान, आता शरद पवार यांच्या पक्षात लवकरच मोठं काहीतरी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण व्हावे तसेच पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. खुद्द आमदार रोहित पवार यांनीच याविषयी माहिती दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी भाषणात महत्त्वाची माहिती दिली. “पुढच्या 15 दिवसात पक्षात प्रमुख संघटनात्मक बदल केले जातील. यावेळी सामान्या कार्यकर्त्यांना, ज्याचो कोणत्याही नेत्याशी नाते नाही, कुठेही घराणेशाहीचे नाते नाही अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना यावेळी संधी दिली जाईल. पुढच्या दहा ते पंधरा दिवसात अशा कार्यकर्त्यांना पदं द्यायचे आहेत,” असे रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता पक्षात मोठं काहीतरी घडणार? असं बोललं जातंय.

दुसरीकडे मुंबईत शरद पवार यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनामित्ताच्या कार्यक्रमात अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. खासदार शरद पवार यांनीही कार्यक्रमात नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. शरद पवार यांनी यावेळी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर भाष्य केले. यावेळी पक्षाचा संघर्ष, आगामी वाटचाल यावरही काही नेत्यांनी भाष्य केले.

पक्षाला नवसंजीवनी मिळणार का?

दरम्यान, रोहित पवार यांनी लवकरच पक्षात महत्त्वाचे बदल होतील, असे सांगितले आहे. परंतु हे बदल नेमके कोणते असतील? पक्षात कोणाला काय संधी दिली जाईल? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रोहित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार आता नेमकी कोणाला संधी मिळणार? शरद पवार यांच्या पक्षात भविष्यात बदल झालेच तर त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळणार का? यहे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us