इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार?

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jan 15, 2021 | 8:00 PM

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नगर जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांची (Nivrutti Maharaj Indurikar) जोरदार चर्चा सुरु आहे.

इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार?

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नगर जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांची (Nivrutti Maharaj Indurikar) जोरदार चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे इंदुरीकर महाराज थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा काल नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. इंदुरीकर महाराज यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुफ्तगू केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या. मात्र टीव्ही 9 मराठीने इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चर्चा खासगी असल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी हात जोडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.

नगर जिल्हयातील अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे जाहीर सभा, तर महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ –  (Sangamner Vidhan sabha) 

संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व राहिलं आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला  म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.  ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत.  विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्मी लागली. तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले. थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठं आव्हान उभ करु पाहत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संगमनेर वाऱ्या वाढल्या आहेत. थोरातांना शह देण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. विखे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील त्याच्यामागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार आहे. त्यामुळे यावेळी थोरातांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला राहिला आहे. शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांचं नाव यंदाही चर्चेत आहे. मात्र, विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहणं सध्या तरी महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

PHOTO : … म्हणून मुख्यमंत्र्यांनी इंदुरीकर महाराजांसमोर हात जोडले   

अहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI