राजभवनाच्या दारावर काही ‘चक्रम वादळे’ अधूनमधून आदळतात : सामना

| Updated on: Jun 04, 2020 | 8:03 AM

प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे, असे ठरवून काम करत असलेल्या विरोधी पक्षाने तात्काळ राजभवन गाठले आणि परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला, असं अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial Taunts BJP over opposing Last Year University Exam Results Issue)

राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळतात : सामना
Follow us on

मुंबई : “राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत. (Saamana Editorial Taunts BJP over opposing Last Year University Exam Results Issue)

“राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरु आहे. राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धी बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेत पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुनावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. “एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील आणि घोळ घालून एक पिढी बरबाद करणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्यांना सुनावतील, “तुमच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमचा छळ का करता? बोलण्यासारखे, करण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षण तज्ञांनी याचे स्वागत केले. मात्र प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे, असे ठरवून काम करत असलेल्या विरोधी पक्षाने तात्काळ राजभवन गाठले आणि परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणारे पत्र लिहिले” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखात ताशेरे ओढण्यात आले आहेत. (Saamana Editorial Taunts BJP over opposing Last Year University Exam Results Issue)

काय आहे निर्णय ? : गुणांची सरासरी काढून निकाल, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा

“देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत आहेत. ‘कोरोना ग्रॅज्युएट’ होण्यापेक्षा हे बोगस पदवीवले डेंजर. ही यादी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे.” असे टोलेही लगावले आहेत.

“कायदा फक्त विद्यापीठालाच नाही, इतर क्षेत्रांनाही लागू आहे. कायद्यानेच कोणी वागायचे म्हटले, तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवून एक बेकायदा शपथविधी पार पडला नसता” असा टोमणाही ‘सामना’च्या अग्रलेखात मारण्यात आला आहे.