AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत, शिंदे सेनेत प्रवेश करताच सचिन अहिर संतापले

Sachin Ahir : आज एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर महत्त्वाचे विधान केले आहे.

ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत, शिंदे सेनेत प्रवेश करताच सचिन अहिर संतापले
Sachin Ahir on Shivsena ubtImage Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 30, 2026 | 4:38 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर आता आमदार सचिन यांनीही ठाकरेंची साथ सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर महत्त्वाचे विधान केले आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ज्यांनी कधी दगड उचलला नाहीत ते आम्हाला शिकवायला लागलेत – अहिर

उद्धव ठाकरे हे नेत्यांना भेटत असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. याबाबत प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी, ‘माझा काही अनुभव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन शिंदे काम करत आहेत. ते आकर्षण आहे. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा ते सांगतील. असा नेता आम्हाला साथ देणार असेल तर काम करायला येते. थोडा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं असं म्हणत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांवर टीका केली आहे.

मी पक्ष बळकट करणार – अहिर

पुढे बोलताना सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. अहिर म्हणाले की, ‘मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे. उपसभापतीपदासाठी अनेक लोकांची नावे घेता येतील. रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून मोठं काम केलं. तीच गरीमा मी ठेवणार आहे. जिथे पक्ष बळकट नाही. तिथे काम करणार आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणार आहे.’

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात