AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारने सगळा लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजप नेते गप्प : काँग्रेस

भाजपच्या आक्रमकपणाची काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फेसबुकवर खिल्ली उडवली आहे (Sachin Sawant slams BJP on demand of Electricity bill relief).

मोदी सरकारने सगळा लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजप नेते गप्प : काँग्रेस
| Updated on: Nov 25, 2020 | 5:30 PM
Share

मुंबई : राज्यात वाढीव वीज बिलावरुन प्रचंड राजकारण तापलं आहे. राज्य सरकारने वाढीव वीजबिल कमी करावे किंवा माफ करावे यासाठी भाजप आणि मनसे मैदानात उतरले आहेत. भाजपकडून वाढीव वीज बिलावरुन वारंवार राज्य सरकारला घेरलं जात आहे. वाढीव वीज बिलावरुन राज्यातील ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपच्या या आक्रमकपणाची काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फेसबुकवर खिल्ली उडवली आहे (Sachin Sawant slams BJP on demand of Electricity bill relief).

“मोदी सरकारने आर्थिक व्होल्टेज कमी करुन सगळा लोड राज्यावर टाकला आहे. पण मविआ सरकारने वीजबिले कमी करावी यासाठी इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजप नेते यावर वीज अवरोधक स्लीपर घालून गप्प बसतात. या दांभिक भाजपकडे लक्ष न देता जनतेला दिलासा कसा द्यायचा ते आम्ही पाहू”, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे (Sachin Sawant slams BJP on demand of Electricity bill relief).

लॉकडाऊनच्या काळात घरगुती ग्राहक आणि कार्यालयांना वीजेची भरमसाठ बिले आली होती. यावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर वाढीव वीज बिलांमध्ये सवलत दिली जाईल, अशी भूमिका सुरुवातीला राज्य सरकारने घेतली होती. मात्र, त्यानंतर काहीही ठोस हालचाली घडताना दिसत नव्हत्या.

अशातच मंगळवारी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असे सांगत हात झटकले होते. लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजेत. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे सरकराच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या सामान्य ग्राहकांना मोठा ‘शॉक’ बसला होता.

नितीन राऊत यांच्या या वक्तव्यानंतर वाढीव वीज बिलांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. यानंतर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली होती.

अशातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वीज बिलाच्या समस्येवर फेरविचार होईल, असे सांगून गोंधळ आणखीनच वाढवला होता. त्यामुळे संपूर्ण राज्याची नजर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीकडे होती. मात्र, या बैठकीत वीजबिल कमी करण्याबाबत किंवा सवलत देण्याबाबत काहीच निर्णय झाला नाही.

संबंधित बातम्या:

Electricity Bill: अर्ज, विनवण्या, बैठका सगळं झालं, आता साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरुन संघर्ष; मनसे नेत्याचे सूचक ट्विट

‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.