AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“105 आमदार कामी आले नाहीत, पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे भाजपला एक जागा”

भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला.

105 आमदार कामी आले नाहीत, पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे भाजपला एक जागा
| Updated on: Dec 04, 2020 | 12:37 PM
Share

मुंबई : भाजपला 105 आमदार कामी आले नाहीत. धुळे नंदुरबार मतदारसंघातील एक जागा मिळाली, तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यामुळे, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. विधानपरिषदेवरील पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावर त्यांनी ट्विटरवरुन भाष्य केलं. (Sachin Sawant taunts BJP says party won one seat because of former Congress leader)

“महाराष्ट्र विकास आघाडीने महाराष्ट्रात भाजपाचा दणदणीत पराभव केला. 105 आमदार कामी आले नाहीत. 1 जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेत्यामुळे! महाराष्ट्र द्रोही भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान केला त्याची शिक्षा जनतेने त्यांना दिली. मविआतील एकोप्याचा हा विजय आहे” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

“105 चे 150 होतील हा फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला. वर्षानुवर्षे ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही निसटला. ज्या मताधिक्याने काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी जिंकले त्यातून मोदी सरकारविरुद्धचा पदवीधरांचा राग दिसला ज्यांना बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले गेले. विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्रात सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. हा काँग्रेस नेत्यांच्या एकोप्याचा विजय आहे. भाजपाचा परतीचा प्रवास आहे.” असा घणाघातही सचिन सावंत यांनी केला.

धुळ्यात भाजपची बाजी

भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांचा सर्वपक्षीय संपर्क असून त्या तुलनेत अभिजीत पाटील नवखे आहेत. पटेल यांचे नेतृत्व आणि कामाची शैली भाजपसह महाआघाडीच्या नेत्यांना माहित आहे, त्यामुळे पटेल यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.

अमरिश पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली.

काँग्रेसचं क्रॉस व्होटिंग पटेलांच्या पथ्यावर

अमरिश पटेल यांना भाजपची मतं तर मिळालीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. आकड्यातच सांगायचं तर भाजपची 199 आणि महाविकास आघाडीची 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले. अभिजीत पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली, तर भाजपचे अमरिश पटेल तब्बल 332 मतं मिळवून विजयी झाले.

अमरिश पटेल यांची कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. (Sachin Sawant taunts BJP says party won one seat because of former Congress leader)

  • 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
  • 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर
  • 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
  • 2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी

VIDEO | विजयानंतर अमरिश पटेल काय म्हणाले ?

महत्त्वाचे निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस) – आघाडीवर नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – आघाडीवर औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष) – आघाडीवर धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप) – विजयी

संबंधित बातम्या 

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

(Sachin Sawant taunts BJP says party won one seat because of former Congress leader)

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.