AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची मतं भाजपला गेल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 03, 2020 | 5:41 PM
Share

नंदुरबार : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची 115 मतं भाजप उमेदवार अमरिश भाई पटेल यांच्या पारड्यात पडली. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेत तणातणी होताना दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेसशी प्रामाणिकपणा दाखवला, काँग्रेसचीच मतं भाजपला गेली, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJP Leader Amrish Patel) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. (Nandurbar Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi claims party loyal to Congress after Amrish Patel victory)

शिवसेनेने धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रामाणिकपणे काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांना मतदान केलं आहे. काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची मतं भाजपला गेल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांचा सर्वपक्षीय संपर्क असून त्या तुलनेत अभिजीत पाटील नवखे आहेत. पटेल यांचे नेतृत्व आणि कामाची शैली भाजपसह महाआघाडीच्या नेत्यांना माहित आहे, त्यामुळे पटेल यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते. अभिजीत पाटील ऐनवेळेस काही करिष्मा करु शकतील का, याकडेच लक्ष होतं. मात्र ती अपेक्षा फोल ठरली.

अमरिश पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

काँग्रेसचं क्रॉस व्होटिंग पटेलांच्या पथ्यावर

अमरिश पटेल यांना भाजपची मतं तर मिळालीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. आकड्यातच सांगायचं तर भाजपची 199 आणि महाविकास आघाडीची 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले.

अभिजीत पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली, तर भाजपचे अमरिश पटेल तब्बल 332 मतं मिळवून विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ

  • भाजप – 199
  • काँग्रेस – 157
  • राष्ट्रवादी – 36
  • शिवसेना 22
  • एमआयएम – 9
  • समाजवादी पार्टी – 4
  • बहुजन समाज पार्टी – 1
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
  • अपक्ष – 1

अनिल गोटेंचा पटेलांवर घणाघात 

“महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप उमेदवार अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. त्यामुळे अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. 50 हजार ते 1 लाखाचा भाव होता” असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला. “महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे, मात्र धुळ्यात बोगस कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा वापर सर्रास केला जात आहे” असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

(Nandurbar Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi claims party loyal to Congress after Amrish Patel victory)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...