अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी दिली

अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 3:04 PM

नाशिक : धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJP Leader Amrish Patel) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर, अमरिश पटेल यांनी धनशक्तीच्या बळावर मिळवलेला विजय अपेक्षित होताच, अशी टीका राष्ट्रवादीचे धुळ्यातील बडे नेते अनिल गोटे (NCP Leader Anil Gote) यांनी केली. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटल्याने पटेल यांचा विजय सुकर झाला. (NCP Leader Anil Gote says BJP candidate Amrish Patel victory was expected in Dhule Nandurbar Vidhan Parishad Election)

महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप उमेदवार अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. त्यामुळे अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. 50 हजार ते 1 लाखाचा भाव होता, असा घणाघाती आरोप गोटेंनी केला. महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे, मात्र धुळ्यात बोगस कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा वापर सर्रास केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

कोण आहेत अनिल गोटे?

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गेल्या वर्षी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या अनिल गोटे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद आहे.

अनिल गोटे यांनी भाजपमध्ये असताना शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली होती. तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरण असो वा कोणताही विषय, अनिल गोटे आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध राज्याने पाहिलं. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता, गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती.

काँग्रेसचं क्रॉस व्होटिंग पटेलांच्या पथ्यावर

अमरिश पटेल यांना भाजपची मतं तर मिळालीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. आकड्यातच सांगायचं तर भाजपची 199 आणि महाविकास आघाडीची 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले.

अभिजीत पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली, तर भाजपचे अमरिश पटेल तब्बल 332 मतं मिळवून विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ

  • भाजप – 199
  • काँग्रेस – 157
  • राष्ट्रवादी – 36
  • शिवसेना 22
  • एमआयएम – 9
  • समाजवादी पार्टी – 4
  • बहुजन समाज पार्टी – 1
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
  • अपक्ष – 10

अमरिशभाई 12 महिन्यांसाठी आमदार

अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता.  पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि  केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली.

या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो केवळ 12 महिन्यांसाठीच आमदार होईल हे निश्चित होतं. मात्र अमरिश पटेल यांनी पुन्हा दावेदारी दाखल करुन उरलेल्या 12 महिन्यांसाठीही आपणच आमदार असू, हे सिद्ध केलं.

अमरिश पटेल यांचा तिसरा विजय

अमरिश पटेल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये बिनविरोध विजय मिळवला होता. मग 2015 मधील विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल हे 321 मतांनी विजयी झाले. त्यानंतर 2020 च्या पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांनी 234 मतांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली.

अमरिश पटेल यांची कारकीर्द

अमरिश पटेल हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्त्वपूर्ण स्थान होते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

  • 1985 -शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष
  • 1990 -शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 1995 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2000 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2005 – शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार
  • 2009 -धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर
  • 2015 – धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर सदस्य
  • 2019 मध्ये काँग्रेस सोडली, आता 2020 मध्ये भाजपच्या तिकीटावरही विजयी

VIDEO | विजयानंतर अमरिश पटेल काय म्हणाले ?

संबंधित बातम्या 

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

(NCP Leader Anil Gote says BJP candidate Amrish Patel victory was expected in Dhule Nandurbar Vidhan Parishad Election)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.