आधी 26 वर्षांनी भेट, आता थेट पक्षप्रवेश, अनिल गोटेंचं कट्टर विरोधक शरद पवारांना बर्थडे गिफ्ट!

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची लोकसभा निवडणुकीवेळी मार्च महिन्यात, तब्बल 26 वर्षांनी भेट झाली होती.

आधी 26 वर्षांनी भेट, आता थेट पक्षप्रवेश, अनिल गोटेंचं कट्टर विरोधक शरद पवारांना बर्थडे गिफ्ट!

धुळे : भाजपचे बंडखोर नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote to join NCP) हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून, ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. (Anil Gote to join NCP) अनिल गोटे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला आधीच रामराम ठोकला होता. आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतर्गत गटबाजी, कटकारस्थान आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा आहे अशा नेत्यांना संपवण्याचा कार्यक्रम भाजपमध्ये होतो, त्याला कंटाळून मी भाजप सोडत आहे. फसवणूक, धोकेबाजी हा भाजपचा स्थायीभाव आहे. त्यामुळे मी भाजप सोडत आहे, असं अनिल गोटे म्हणाले.

भाजपने मला अत्यंत घाणेरडी वागणूक दिली. मी संघस्वयंसेवक होतो, 30 वर्ष काम केलं. मात्र माझं खच्चीकरण झालं. देवेंद्र फडणवीस हे 100 टक्के यासाठी जबाबदार आहेत. फडणवीसांसोबत टाकाऊ लोक आहेत. त्यांनीच ही परिस्थिती आणली आहे. फडणवीसांना मी तीन तीन वेळा भेटलो होतो, मात्र त्यांनी ऐकलं नाही. गिरीश महाजनांचा धुळ्यात काय संबंध? त्यांच्याकडे सूत्रं दिली. मला एबी फॉर्म देतो म्हणून सांगितलं पण दिला नाही, ही फसवणूक का? मला तोंडावर का सांगितलं नाही? माझं काय चुकलं हे त्यांनी सांगायला हवं होतं, असं अनिल गोटे म्हणाले.

शरद पवारांची 26 वर्षांनी भेट

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची लोकसभा निवडणुकीवेळी मार्च महिन्यात, तब्बल 26 वर्षांनी भेट झाली होती. अनिल गोटे हे पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले होते. अनिल गोटेंनी पवारांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली होती. तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरण असो वा कोणताही विषय, अनिल गोटे आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध राज्याने पाहिलं.  तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता, गोटेंनी पवारांवर आतापर्यंत विखारी टीका केली होती.

काही महिन्यापूर्वीच धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली होती. भाजपचेच असलेल्या अनिल गोटे यांनी गिरीश महाजन आणि विशेषत: केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता.

धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळून लावली होती. तसंच स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं होतं.

संबंधित बातम्या  

सुभाष भामरेंना पाडण्यासाठी तब्बल 26 वर्षांनी अनिल गोटे पवारांना भेटले!  

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे  

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *