AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, सदाभाऊ खोतांची खोचक टीका

राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
सदाभाऊ खोत यांनी आण्णा हजारेंची भेट घेतली
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 3:19 PM
Share

अहमदनगर : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. दूध दरवाढ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, अशी खोचक टीकाही खोत यांनी केलीय. खोत यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली. (Sadabhau Khot meet Anna Hazare, Khot criticizes Thackeray government)

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे आता घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. हे सरकार कोरोनाचं भूत घेऊन सर्वत्र हिंडत आहे. मोर्चे, आंदोलनावर बंदी घातली जात आहे. खरं तर ठाकरे सरकारलाच कोरोना झालाय. हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होईल असं वाटत नाही, असा टोला खोत यांनी लगावलाय. तसंच दूध दरवाढीचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे. त्यावर कायमस्वरुपी मार्ग निघायला हवा. राज्यात रोज 2 कोटी लीटर दूध संकलन होतं. त्यातले 30 टक्के सहकारी संस्था तर 20 टक्के दूध खासदार कंपन्या खरेदी करतात. मात्र, आता खासगी कंपन्यांचं मोठं रॅकेट तयार झालं आहे. हे रॅकेट सत्ताधारी लोकांचेच आहे. त्यामुळे काही काळ दर वाढवायचा तर पुन्हा कमी करायचा, असा प्रकार सुरु असल्याचा आरोप खोत यांनी केलाय.

‘मराठा समाजाला न्याय देण्याची नियत सरकारमध्ये नाही’

आज महाविकास आघाडी सरकारकडे पाहिलं तर आपला पक्ष, आपला आर्थिक संच कसा आणि कोणत्या मार्गाने वाढवता येईल याची स्पर्धा लागलेली पाहायला मिळतेय. विकासासाठी मात्र हे सरकार काही करत नाही. राज्यात ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पीककर्ज, खत, बी बियाणे मिळत नाही. मराठा समाजाला न्याय देण्याची नियतही या सरकारची नाही, असा गंभीर आरोपही खोत यांनी ठाकरे सरकारवर केलाय.

सदाभाऊ खोतांची आण्णा हजारेंशी भेट

सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली व तब्बेतीची विचारपुस केली. केंद्र सरकारचे कृषी विधेयक, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण, शेतकऱ्यांचे राज्यातील विविध प्रश्न, सहकारी कारखाने इत्यादी विषयी चर्चा झाली. आण्णांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळी द्वारे राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर आण्णांनी जन आंदोलनाच्या माध्यमातुन माहितीच्या अधिकार सर्व सामान्यांना मिळवुन दिला. या पार्श्वभूमीवर खोत यांनी आण्णांची भेट घेतली.

संबंधित बातम्या :

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं

मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, रात्रंदिवस झोपलं तरी चालतं: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot meet Anna Hazare, Khot criticizes Thackeray government

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.