AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal: साहेब निर्णय घ्या… नाशिकमध्ये लागले पोस्टर, समर्थक नाराज; भुजबळ निर्णय घेणार?

Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. आता भुजबळ यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत विरोध दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Chhagan Bhujbal: साहेब निर्णय घ्या... नाशिकमध्ये लागले पोस्टर, समर्थक नाराज; भुजबळ निर्णय घेणार?
bhujbal PosterImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 09, 2026 | 4:55 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून मोठी खळबळ माजली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादीमधून मंत्री छगन भुजबळ यांचीच राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट झाला आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं. NCP च्या या निर्णयामुळे भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे.

नाशिकमधील पोस्टरने वेधले लक्ष

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यसभा तिकिट न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत विरोध दाखवण्यास सुरुवात केली आहे. समर्थकांनी नाशिकच्या येवला शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. त्यावर “साहेब, निर्णय घ्या” असे लिहिले आहे. या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शेवटच्या क्षणी छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभा उमेदवारांच्या यादीतून बाहेर पडल्यानंतर समर्थकांमध्ये रोष वाढला आहे.

भुजबळांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी होती

खरं तर, यावेळी पक्ष ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी करत होता. पक्षात बैठकांचा सिलसिला सुरू झाल्यानंतर भुजबळ यांच्याशी राज्यसभेबाबत चर्चा झाली. तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, पुतण्या समीर भुजबळ यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनवले तरच ते राज्यसभेत जातील. भुजबळ यांची ही मागणी पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. फडणवीस यांनी दिल्लीत चर्चा करून निर्णय सांगण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिल्लीत भुजबळ यांच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. फक्त एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा शपथविधी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपल्याला लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. यापूर्वीही अनेकदा संधी जवळ आली पण मिळाली नाही. मात्र हे प्रकरण आता इतक्यावरच थांबलं नसून मोठं रुप घेत आहे. भुजबळांचे समर्थकांनी तीव्र नारीजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी थेट बॅनरबाजी करण्यात आली आहे. अनेक बॅनरवर साहेब आता निर्णय घ्या असं दिसून आलं आहे.

Follow Us
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका