साई रिसॉर्ट पाडणे आहे… बांधकाम विभागाची पेपरात जाहिरात; अनिल परब यांना धक्का

14 नोव्हेंबर रोजी हे टेंडर ओपन झालं आहे. तसेच रिसॉर्ट पाडण्याचं काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतं, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

साई रिसॉर्ट पाडणे आहे... बांधकाम विभागाची पेपरात जाहिरात; अनिल परब यांना धक्का
साई रिसॉर्ट पाडणे आहे... बांधकाम विभागाची पेपरात जाहिरात; अनिल परब यांना धक्काImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 12:25 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी: राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. अनिल परब यांचं दापोलीतील साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आहे. तसेच तीन महिन्यात हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परब यांचं हे रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.

दरम्यान, चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून आज स्थानिक वर्तमानपत्र दैनिक तरुण भारतमध्ये टेंडर जाहिरात देण्यात आली आहे. साई रिसॉर्ट पाडण्यासाठीची ही जाहिरात असून कंत्राटदारांना 10 नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरण्याचं आवाहन या जाहिरातीतून करण्यात आलं आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊड वॉल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायच्या आहेत. तसेच रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रिसॉर्ट पाडलेल्या जागेचं सपाटीकरण करायचं आहे, असं या टेंडरमध्ये कामाचं स्वरुप देण्यात आलेलं आहे.

या कामाचा अंदाजित रक्कम 4329008 एवढी ठरवण्यात आली आहे. तसेच इसारा रक्कम 43300 एवढी ठेवण्यात आहे, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. तसेच तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदतही देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदार या जाहिरातीला कशापद्धतीने प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही जाहिरात आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. 14 नोव्हेंबर रोजी हे टेंडर ओपन झालं आहे. तसेच रिसॉर्ट पाडण्याचं काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतं, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सोमय्या यांनी साई रिसॉर्टच्या बांधकामावर आक्षेप घेतला होता. पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधणअयात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे रिसॉर्ट पाडण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.