AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhajiraje Chhatrapati : ‘जे राजेंचा सन्मान करु शकत नाहीत, ते कार्यकर्त्यांचा काय करणार?’ शिवसेनेकडून सुरु असलेल्या ट्रोलिंगवर छावा संघटनेचं प्रत्युत्तर

छावा संघटना आणि मराठा समन्वयकांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेकडूनही छावाचे प्रमुख धनंजय जाधव यांचं जोरदार ट्रोलिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता धनंजय जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय.

Sambhajiraje Chhatrapati : 'जे राजेंचा सन्मान करु शकत नाहीत, ते कार्यकर्त्यांचा काय करणार?' शिवसेनेकडून सुरु असलेल्या ट्रोलिंगवर छावा संघटनेचं प्रत्युत्तर
संभाजीराजे छत्रपती, धनंजय जाधव, छावा संघटना प्रमुखImage Credit source: TV9
| Edited By: sagar joshi | Updated on: May 25, 2022 | 5:13 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांच्या निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. मात्र, शिवसेनेकडून दुसरा उमेदवार जाहीर करण्यात आल्यामुळे संभाजीराजे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंना पक्षप्रवेशाची ऑफर देत शिवसेनेच्या (Shivsena) तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यावर अडून राहिले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतापलेल्या छावा संघटना आणि मराठा समन्वयकांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेकडूनही छावाचे प्रमुख धनंजय जाधव यांचं जोरदार ट्रोलिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता धनंजय जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय.

छावाप्रमुख धनंजय जाधव म्हणाले की, ‘मी मागील अनेक वर्षांपासून संभाजीराजेंच्या समवेत समाजासाठी लढतोय. या राज्यसभेच्या प्रक्रियेत देखील मी पूर्ण वेळ राजेंसोबत होतो. त्यातील घडामोडी मी जवळून पहिल्या. नेत्यांनी शब्द कसे फिरवले याचा मी साक्षीदार आहे. हेच मी फक्त मीडिया समोर मांडले. त्यात माझं काय चुकलं? पण ज्याप्रकारे शिवसेनेची ट्रोलिंग टीम मला ट्रोल करून बदनाम करत आहे हे चुकीचं आहे. जे राजेंचा सन्मान करत नाहीत ते कार्यकर्त्यांचा काय करणार. सन्मानाची अपेक्षा मी करत नाही. पण आजपर्यंत समाजासाठी काम करताना मी पक्ष कोणता आहे ते पाहिलं नाही. त्यांचे परिणाम काय होतील ते पाहिलं नाही, असं जाधव यांनी म्हटलंय.

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत केलेली युती चालते, पण…

‘एखादा कार्यकर्ता असा काम करत असेल तर त्याला बदनाम करण्याचा काम हे राजकीय पक्ष करत असतात. मी लाठ्या काठ्या खाणारा कार्यकर्ता आहे अश्या टिकेने मी माझं काम थांबणार नाही. तळागळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे राजकीय पक्ष असेच संपवण्याचा घाट घालतात. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत केलेली युती चालते. पण सामाजिक कार्यकर्त्याचे फोटो एखाद्या नेत्यांसोबत आले की त्यांना बदनाम केलं जातं. म्हणूनच अश्या सर्वच तळागाळातील तळमळीच्या कार्यकर्त्यांना घेऊन स्वराज्य स्थापन करून त्यांना हक्काचं व्यासपीठ द्यायचं आहे, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

धनंजय जाधव यांची ठाकरे, पवारांवर टीका

‘संभाजीराजेंनी दिल्ली मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या होत्या. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं होतं की ते ही जागा कशा पद्धतीने लढत आहेत, यामध्ये मला तुमचं सहकार्य हवं. शरद पवार यांनी नांदेडमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही आमची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देऊ. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडल्यानंतर चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, अनिल देसाई, अनिल परब असतील. त्याचबरोबर शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत असतील. या सगळ्यांना माहिती होतं. याबाबत चर्चा खूप पुढे गेली होती. एक ड्राफ्ट ठरला होता. संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यात अडचण असेल तर त्यांना शिवसेना पुरस्कृत कसं करता येईल. या पद्धतीचा ड्राफ्ट एका मंत्र्याच्या बंगल्यात तयार झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आणि संभाजीराजेंची ट्रायडंट हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. तिथे संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याबाबत एकवाक्यता झाली. आजही वेळ गेलेली नाही. सन्माननीय पवार साहेबांवर लागलेला विश्वासघातकीचा डाग पुसण्याची ही संधी आहे. पवार साहेब, आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपतींना दिलेला शब्द फिरवता कामा नये’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी मंगळवारी दिली होती.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?