संदेश पारकरांचा शिवसेनेला पाठिंबा, नितेश राणेंविरोधात कडवं आव्हान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात (Nitesh Rane vs Satish Sawant Kankavli)आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोड घडल्या.

  • महेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 15:50 PM, 7 Oct 2019
संदेश पारकरांचा शिवसेनेला पाठिंबा, नितेश राणेंविरोधात कडवं आव्हान

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात (Nitesh Rane vs Satish Sawant Kankavli)आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोड घडल्या. कणकवली मतदारसंघातून (Nitesh Rane vs Satish Sawant Kankavli) संदेश पारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारी नंतर भाजपमधून बंड करत अपक्ष अर्ज सादर केला होता.

त्यामुळे आता कणकवलीत भाजप उमेदवार नितेश राणे विरुद्ध शिवसेना उमेदवार सतीश सावंत अशी थेट लढत होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती जाहीर झाली. तशीच ती सिंधुदुर्गात पण जाहीर झाली. भाजपने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर इथल्या युतीत ठिणगी पडली. पूर्वीचे राणेंचे कट्टर शिलेदार सतीश सावंत हे काहीच दिवसांपूर्वी राणेंना सोडून शिवसेनेत गेले. शिवसेनेने त्यांची लोकप्रियता जाणून, युती असूनही त्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून समोर आणलं. युतीचा धर्म भाजपने लोकसभेच्या निवडणुकीवेळीच पाळला नसल्याचा आरोपही यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला.

शिवसेनेवर टीका करणार नाही – नितेश राणे

मी पुढचे तेरा दिवस शिवसेना किंवा शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यांविरोधात टीका करणार नाही, असा पवित्रा भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांनी घेतला आहे.

मी ही निवडणूक माझ्या मतदारांसाठी लढवतोय. मी महायुतीचा उमेदवार आहे. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय, एका भाजपच्या उमेदवारांमुळे राज्यातील इतर भाजपचे उमेदवार अडचणीत येऊ नये, म्हणून मी कणकवलीतल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार आहे, त्यांची मदत सुद्धा मला हवी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि सेनेचे सतिश सावंत असा सामना रंगणार आहे. त्यामुळे इथली निवडणूक रंगतदार आहे.