सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातसुनेला बहुमान

| Updated on: Dec 07, 2021 | 8:39 AM

महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळे त्यांची निवड ही निश्‍चितच होती. तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील यांचेच नाव चर्चेत होते.

सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातसुनेला बहुमान
सांगली जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड
Follow us on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sangli District Co Operative Bank) अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक (Mansinghrao Naik) यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्रीताई मदन पाटील (Jayshree Madan Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री मदन पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळाला आहे.

निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.

कोण आहेत जयश्री पाटील?

जयश्री पाटील या दिवंगत नेते आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil) यांच्या नातसून आहेत.

महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा

सांगली जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होऊन 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने 17 तर भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलने 4 जागांवर विजय मिळवला होता.

महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळे त्यांची निवड ही निश्‍चितच होती. तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील यांचेच नाव चर्चेत होते.

पतंगराव कदमांनंतर जयश्री पाटलांचं मोठं काम

काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी असत. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही, अशी खदखद त्यांच्या मनात होती.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत, मुलीला राष्ट्रवादीकडून मोठं पद

इस्लामपुरात राष्ट्रवादीला नेतृत्व मिळेना, जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटलांकडे धुरा?