AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत, मुलीला राष्ट्रवादीकडून मोठं पद

जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Jayashree Madan Patil NCP )

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी 'घड्याळ' बांधण्याच्या तयारीत, मुलीला राष्ट्रवादीकडून मोठं पद
काँग्रेस नेत्या जयश्री पाटील
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 04, 2021 | 9:37 AM
Share

सांगली : काँग्रेस नेत्या जयश्री पाटील (Jayshree Madan Patil) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जवळपास वर्षभरापासून सुरु होती. अशातच त्यांची कन्या सोनिया होळकर यांची नाशिक राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महानगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जयश्री पाटील या दिवंगत नेते आणि माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil) यांच्या नातसून आहेत. (Sangali Congress Leader Jayashree Madan Patil likely to join NCP Daughter Sonia Holkar joins)

जयश्री पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मध्यंतरी जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र राज्यमंत्री विश्वजीत कदम, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीतनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

…तर विश्वजीत कदम यांच्या गटाला मोठा धक्का

आता जयश्री पाटील यांच्या कन्येला अर्थात वसंतदादा पाटील यांच्या पणतीला राष्ट्रवादीकडून मोठं पद मिळाल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्येही राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत. जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला, तर सांगलीत विश्वजीत कदम यांच्या गटाला मोठा धक्का बसू शकतो.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मंत्री विश्वजित पतंगराव कदम आणि युवा नेते विशाल प्रकाशबापू पाटील असे दोन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने परस्परविरोधी काम करतात, असे म्हटले जाते.

मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ

दुसरीकडे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. भाजपसारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्याअगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचंही बोललं जातं आहे.

पतंगराव कदमांनंतर जयश्री पाटलांचं मोठं काम

काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी असत. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही, अशी खदखद त्यांच्या मनात होती.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर

इस्लामपुरात राष्ट्रवादीला नेतृत्व मिळेना, जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटलांकडे धुरा?

(Sangali Congress Leader Jayashree Madan Patil likely to join NCP Daughter Sonia Holkar joins)

Follow Us
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...