Sanjay Rathod | संजय राठोड राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील ‘राजकीय गुरु’च्या भेटीला

Sanjay Rathod | संजय राठोड राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील 'राजकीय गुरु'च्या भेटीला
संजय राठोड दिवाकर रावतेंच्या भेटीला

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर दिवाकर रावते यांची स्वतंत्र भेट घेतली. (Sanjay Rathod meets Diwakar Raote )

अनिश बेंद्रे

|

Mar 01, 2021 | 2:22 PM

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) संशयाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे वनमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) पक्षातील ‘राजकीय गुरु’च्या भेटीला गेले. संजय राठोड यांनी शिवालयात जाऊन शिवसेना नेते दिवाकर रावते (Diwakar Raote) यांची भेट घेतली. त्यामुळे राठोड यांची पुढील राजकीय वाटचाल काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sanjay Rathod meets Political Guru Diwakar Raote after resigning as Forest Minister)

दिवाकर रावतेंशी बंद खोलीत चर्चा

दिवाकर रावते हे शिवसेनेचे विदर्भाचे संपर्कप्रमुख आहेत. नेते म्हणून असताना संजय राठोड हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. संजय राठोड हे दिवाकर रावते यांना आपले राजकीय गुरु मानतात. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर दिवाकर रावते यांची स्वतंत्र भेट घेतली. दोघांमध्ये काही काळ बंद खोलीत बातचित झाल्यामुळे राजकीय चर्चांना मात्र सुरुवात झाली आहे.

शासकीय गाडी-बंगला सोडले

संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपली शासकीय गाडी जमा केली. बंगला सोडला, याशिवाय कर्मचारी आणि ऑफिसचा स्टाफही सोडला. आता ते फक्त आमदार म्हणून रावतेंच्या भेटीला गेले.

आमदारकीचा राजीनामा दिला नाही, फक्त मंत्रिपद सोडलं, असं शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी काल वनमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केलं होतं. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे, परंतु विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरुन पायउतार झाल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं होतं. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

वन खातं ठाकरेंकडे

संजय राठोड यांच्या खात्याचा भार कुणाकडे देण्यात आला? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं. (Sanjay Rathod meets Political Guru Diwakar Raote after resigning as Forest Minister)

कुणालाही पाठीशी घालणार नाही

सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले? गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

(Sanjay Rathod meets Political Guru Diwakar Raote after resigning as Forest Minister)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें