पंजाबच्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक, शेतकऱ्यांना खलिस्तानची आठवण करुन देणं दुर्दैवी: संजय राऊत

| Updated on: Nov 29, 2020 | 11:07 AM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. Sanjay Raut Farmer Protest

पंजाबच्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक, शेतकऱ्यांना खलिस्तानची आठवण करुन देणं दुर्दैवी: संजय राऊत
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा. आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना टीका केली तर वाईट वाटते. पंजाबमधून आलेला शेतकरी अन्नदाता आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा खलिस्तानची आठवण करुन देणार असाल तर ते दुर्दैवी आहे. पंजाबमध्ये ठिणगी टाकायची आहे का?, अस्थिरता, अशांतता निर्माण करायची आहे का? हे पाहावे लागेल, असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखताना ते देशाबाहेरचे असल्यासारखा व्यवहार केला गेला. शेतकऱ्यांशी ते दहशतवादी असल्यासारखा व्यवहार केला गेला. पंजाब आणि हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणे देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. पंजाबला पुन्हा एका अस्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेविषयी भाष्य केले. सरकारस्थापनेविषयीच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या नाहीत. शरद पवार यांना लपून छपून भेटत नाही. त्यांना खुलेआम रोज भेटतो. ते महाराष्ट्राचे,देशाचे नेते आहेत त्यांना रोज भेटतो यात रहस्य काय?,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामनाच्या रोखठोकमधून सरकार स्थापनेविषयी गौप्यस्फोट

मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खर्गे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खर्गे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)

संबंधित बातम्या : 

विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

…तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र

(Sanjay Raut criticize BJP and Central Government on Farmer Protest)