AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रणनीती, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay Raut meet Sharad Pawar Rajya sabha election) यांची भेट घेतली.

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रणनीती, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
| Updated on: Mar 09, 2020 | 2:44 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay Raut meet Sharad Pawar Rajya sabha election) यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. (Sanjay Raut meet Sharad Pawar Rajya sabha election)

त्याबाबत संजय राऊत म्हणाले, “ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढणार आहे. राज्यसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. काँग्रेसचीही मतं आहेत, त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो आणि त्या जागेसंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानुसार ती जागा यावेळेला राष्ट्रवादीकडे आहे. त्या जागेवर फौजिया खान यांची उमेदवारी पवार साहेबांनी जाहीर केली आहे”

पवार साहेबांची आणि माझी भेट नेहमीच होत असते. वेगळं काही नाही, पवार साहेबांना, सुप्रियाताईंना मी नेहमी भेटत असतो, अशी पुष्टीही संजय राऊतांनी जोडली.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर भाष्य

मनसे हा एक राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षाने काय करावं, एखाद्याबाबत सल्ला देणं मी बरोबर नाही. त्यांच्या पक्षात त्यांच्या विचारानुसार चालत असतं. त्यांना 14 वर्षे झाली. आपला संस्कार आणि संस्कृती आहे की त्यांना शुभेच्छा, असं संजय राऊत म्हणाले.

अयोध्या दौऱ्यावर टीका का?

अयोध्या दौऱ्यावर टीका का करावी, असं काय होतं किंवा माननीय उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्येला गेले होते का? त्यामुळे टीका का आणि कोणती यावर  विरोधी पक्षनेत्यांनी आत्ममंथन करावं, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

स्वतःला ट्रेन करणे गरजेचे आहे. कोणताही विचार न करता टीका केल्याने विरोधी पक्षाची प्रतिष्ठा कमी होते. या राज्यांमध्ये, या देशांमध्ये, विरोधी पक्ष सक्रिय असला पाहिजे, टिकला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार आहे, तीन भिन्न विचारधारा असून सुद्धा शिवसेनेनं हिंदुत्वाची धार अजिबात कमी केली नाही. उलट ती आहे त्यापेक्षा जास्त प्रकट झाली याची कुठेतरी जाण भाजपला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना 2-2) चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो. (Shivsena leader in race for Rajyasabha)

भाजपकडून खडसेंना तिकीट?

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर (Eknath Khadse Rajyasabha) निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवारही ठरला

राज्यसभेसाठी महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

राज्यसभेसाठी भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात, एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.