शिवसेना खासदार संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, शरद पवारांची भेट!

शिवसेना खासदार आणि संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut meet Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळी सिल्व्हर ओक या शरद पवार (Sanjay Raut meet Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

शिवसेना खासदार संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर, शरद पवारांची भेट!

मुंबई : शिवसेना खासदार आणि संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut meet Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळी सिल्व्हर ओक या शरद पवार (Sanjay Raut meet Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

सध्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याची चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

भाजपला इशारा

शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही, जो शब्द दिलाय तो पाळा, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी भाजपला दिला होता. शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. राजकारणात सगळ्यांना पर्याय खुले आहेत. शिवसेना लहान मुलांचा पक्ष नाही. समसमान वाटप याचा अर्थ काय? त्यात मुख्यमंत्री पद येत नाही का? भाजप नेते जर पर्याय आहे म्हणत असतील, तर सेनेकडे पर्याय नाही का? आता प्रस्ताव नाही तर थेट चर्चा व्हावी, भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्तेचा दावा करावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी आज केला होता.

शिवसेनेचं संख्याबळ 63 वर

शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे. जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचं संख्याबळ अपक्षांच्या जोरावर 63 वर पोहोचलं आहे. आतापर्यंत 7 अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या 

ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश, संजय राऊत यांचं मुनगंटीवारांना उत्तर 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI