AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शशिकांत वारिसेंचा खून झाला, तिथले 4 CCTV बंद कसे? सामंत म्हणतात Plan होता, तर मग यात कोण कोण? संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं!

घटनास्थळाजवळ पेट्रोल पंपावर 8 कर्मचारी होते. आठही कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातोय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

शशिकांत वारिसेंचा खून झाला, तिथले 4 CCTV बंद कसे? सामंत म्हणतात Plan होता, तर मग यात कोण कोण? संजय राऊतांनी सरकारला धारेवर धरलं!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 17, 2023 | 12:41 PM
Share

दिनेश दुखंडे, रत्नागिरीः राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कालपासून कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर संजय राऊत यांनी त्यापूर्वीच वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा मोठा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. म्हणजेच स्थानिक पोलिसदेखील दबावाखाली काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोकणातला तरुण पत्रकार अशा प्रकारे मारला गेला. त्याला मारण्यात आलं, हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. या कोकणातून महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले. लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर कोकणातले आहेत. त्याच भूमीत एक तरुण पत्रकार, त्याच्या भूमिका कुणाला पटत नाहीत म्हणून त्याला चिरडून, गाडीखाली फरपटत मारला जातो.

आता बिहारला महाराष्ट्राची उपमा

पूर्वी बिहारमधील गुंडगिरीची उपमा दिली जायची. आता बिहारलाच महाराष्ट्राची उपमा दिली जाते, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ पूर्वी अशा घटना बिहारमध्ये घडत होत्या. आता बिहारला म्हटलं जातंय, तुमचा महाराष्ट्र झालाय का? ही हत्या साधी नाही. लोक ठरवत असतात, काय हवंय, काय नको. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार मारला जातो. त्यामागे कोण आहे, याचा तपास करावा.. हा तपास स्वतंत्रपणे निःपक्षपाती होईल का ही आजही शंका आहे.यात राजकीय षडयंत्र आहे. शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात सातत्याने लिहित होता. त्यातून ही हत्या झाली आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.

या गोष्टींवर तपासाची मागणी..

  •  राजापूर रिफायनरीच्या आसपास जे जमीनदार आहेत. बाहेरून ज्यांनी जमिनी खरेदी केल्या. त्यात कुणाचे हात आहेत, यावर तपास झाला पाहिजे.
  • जो संशयित मारेकरी कोठडीत आहे. त्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी होते, पक्षाशी होते, हा तपासाचा विषय आहे.
  • ११ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. ते कोण आहेत? या देशात कोणतीही यंत्रणा स्वतंत्र नाही. न्यायालयापासून अनेक संस्थांवर राजकीय दबाव आहेत. त्याखालीच कारवाया चालतात. या खुनाचा तपास त्या पद्धतीने होईल का? हा तपासाचा विषय आहे.
  • जिथे खून झाला… वारिसे खुनाची जागा पेट्रोल पंप,त्या भागातले तिन्ही सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे? त्याचं फुटेज मिळत नाहीये. पेट्रोलपंपावर ८ कर्मचारी होते. आठही कर्मचाऱ्यांवर जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला जातोय. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की प्लॅन करून खून केला… प्लॅन एकट्याचा होत नाही. मग त्यात कोण कोण आहेत, हा तपासाचा विषय आहे..
  •  स्थानिक पोलीस तिथपर्यंत का पोहोचले नाहीत, हा तपासाचा विषय असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.