शिवसैनिकांनी योग्यच केलं; अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन

अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड उखडून फेकला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. (sanjay raut reaction on Shiv Sena workers vandalise 'Adani Airport' board)

शिवसैनिकांनी योग्यच केलं; अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याचं राऊतांकडून समर्थन
संजय राऊत

नवी दिल्ली: अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड उखडून फेकला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करतानाच शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut reaction on Shiv Sena workers vandalise ‘Adani Airport’ board)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.

पुण्याचा धोका अजूनही संपलेला नाही

यावेळी राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात देण्यात आलेल्या शिथिलतेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यातला धोका अजूनही संपलेला नाही. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्ण अधिक आहे. त्यामुळे पुण्याच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसेल. याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच अधिक बोलतील. मुंबईतही लोकल सुरू नाही. रेस्टॉरंट बंद आहे. निर्बंध मुंबईतही आहेत. फक्त दुकानांच्या वेळेत फरक आहे, असं त्यांनी सांगितलं.

नितीश कुमारांचे आभार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीश कुमार बुजुर्ग नेते आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य विरोधी पक्षात गेलंय. पेगसास विषय हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. आम्ही सर्व लोक या संदर्भात सभागृहात सवाल करत आहोत. सरकार देशाची मन की बात ऐकत नाही. आम्ही सरकारची मन की बात ऐकत आलो आहोत. पण आमची मन की बात ऐकली जात नाही. नितीश कुमार या विषयावर बोलले. त्यांचे आभार. ते एनडीएचे घटक आहेत. ते सरकारच्या सोबत आहेत. पण त्यांचा आत्मा आजही आमच्यासोबत भटकत आहे, असं ते म्हणाले. (sanjay raut reaction on Shiv Sena workers vandalise ‘Adani Airport’ board)

 

संबंधित बातम्या:

आमचा सीएम जगात भारी, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल : संदीप देशपांडे

जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी साताऱ्यात तरुणाची हत्या, चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन उलगडा

Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

(sanjay raut reaction on Shiv Sena workers vandalise ‘Adani Airport’ board)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI