Sanjay Raut | ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं, धमकावत म्हणाले ‘अंदर डाल देंगे!

| Updated on: Feb 09, 2022 | 10:50 AM

Sanjay Raut daughter wedding : संजय राऊतांनी मुलीच्या लग्नातला अनुभव तर सांगितलाच. शिवाय राऊतांचे निकटवर्तीय असलेल्या स्वप्ना पाटकर यांच्यावरुनही गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहे.

Sanjay Raut | माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं, धमकावत म्हणाले अंदर डाल देंगे!
संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात नेमकं काय घडलं?
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप केला. या आरोपांसोबत त्यांनी आपल्याला आलेले अनुभवही या पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या मुलीच्या लग्नाच्या (Sanjay Raut daughter wedding) डेकोरेशनसाठी आलेल्या फूलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी (Raut Allegations on ED) चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली.

काय घडलं मुलीच्या लग्नात?

मुलीच्या लग्नात घडलेल्या या प्रसंगावर बोलताना राऊतांनी फूलवाल्यासोबत घडलेल्या प्रसंगावरुन ईडीवर थेट हल्लाबोल केला. फूलवाल्याला जेव्हा पैशांबाबत विचारणा करण्यात आलेली तेव्हा त्यानं कोणतेही पैसे न घेतल्याचं म्हटलंय. राऊतांची मुलगी ही माझ्या घरातल्याप्रमाणेच आहेत. तिला मी लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. तिच्या लग्नात मी पैसे कसे काय घेऊ, असं म्हटल्यानंतर गन पॉईन्टवर त्याला ईडीच्या लोकांनी धमकावलं असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊतांनी मुलीच्या लग्नातला अनुभव तर सांगितलाच. शिवाय राऊतांचे निकटवर्तीय असलेल्या स्वप्ना पाटकर यांच्यावरुनही गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशातच थेट निशाणा साधत राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामगिरीवर गंभीर आरोप केले. लवकर पुराव्यानिशी याबाबत बोलणार असल्याचं राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. ही पत्रकार परिषद आपण ईडी कार्यालयासमोर घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

पाहा व्हिडीओ

राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेली 10 मोठी वक्तव्य कोणती?

संजय राऊत यांनी एका पत्रातून केंद्रीय तपाय यंत्रणांवर आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राचा अपमान केल्याचा ठपका ठेवत मोदींवर निशाणा साधताना राऊतांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय..

1 लेटरबॉम्ब टाकत केलेले गंभीर आरोप हा ट्रेलरही नाही, तुम्ही बघाल पुढे पुढे काय काय समोर येतं ते!

2. फडणवीसांना कळलं असेल, मी काय सांगतोय ते. नंतर अशी अवस्था करु की नागपुरातही जायची सोय उरणार नाही.

3. केंद्राकडून केंद्रीय तपाय यंत्रणाचा वापर केला जात असून ईडीच्या मदतीनं क्रिमिनल सेंडिकेट चालवतात आणि मनी लॉड्रिंग हे पुराव्यानिशी दाखवून देऊ

4. दादरा नगर हवेलीत शिवसेना जिंकल्यानंतर यांना जास्त राग आला आणि त्यातूनच कारवाया वाढल्यात

5. मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार, त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेणार

6. सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय.. बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत?

7. पवारांच्या कुटुंबीयांकडे पाच दिवस जाऊन इडीकडे जाऊन बसली ही लोकं…हे पवारांच्या बाबतीत घडलंय..हे आमच्या बाबतीत घडलेय.. तुम्हाला काय वाटतं.. आम्ही गुडघे टेकू…?

8. तुम्ही कोण आहात, मुंबईत शिवसेना दादा आहे, मुंबईत शिवसेना दादागिरी करेल!

9. कुणीतरी बेवड्यासारखा उठतो, खोटे पुरावे तयार करतो आणि कारवाई करा अशी मागणी करतो

10. जास्त बोलत नाही, ईडीच्या कार्यालयात काय चाललंय. याचे सूत्रधार कोण आहेत, हे लवकरच मी तुम्हाला सांगेन..

संबंधित बातम्या :

VIDEO: ‘मुंबईत शिवसेनाच दादा!,’ संजय राऊतांची डरकाळी; ईडीविरोधात सनसनाटी आरोप

महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून काही जण भेटले, राऊतांचं उपराष्ट्रपतींना लिहिलेलं संपूर्ण पत्र

‘आम्ही जेलमध्ये गेलो, तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू’ राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचा थेट प्रहार, काय म्हणाले?