Sanjay Savkare : जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; समर्थकांकडून दुसऱ्या वर्षीही भाजप नेते गायब, राजकीय चर्चांंना उधाण

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजप (BJP) आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare ) यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपचे नेते गायब झाल्याचे दिसून येत आहे.

Sanjay Savkare : जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; समर्थकांकडून दुसऱ्या वर्षीही भाजप नेते गायब, राजकीय चर्चांंना उधाण
संजय सावकारे एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 7:33 AM

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजप (BJP) आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare ) यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपचे नेते गायब झाल्याचे दिसून येत आहे. बॅनरवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknathk Khadse ) यांचा फोटो आहे. भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. संजय सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजप खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. जळगावातील राजकीय वर्तुळात मात्र बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

संजय सावकारे एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय

भाजपचे आमदार संजय सावकारे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, एकनाथ खडसे राष्ट्रवादी मध्ये गेल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे . त्यातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Sanjay Sawkare Birthday Wishes

संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी लावलेले बॅनर

गेल्या वर्षीही भाजप नेते गायब

भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. भाजपचे जळगावातील बडे नेते संकटमोचक गिरीश महाजन यांचा देखील फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यावेळी देखील संजय सावकारे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

संजय सावकारेंनी पक्षांतराच्या बातम्या नाकरल्या

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ संजय सावकारे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र, संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना इतर भाजप नेत्यांचे फोटो छापले नव्हते. मात्र, संजय सावकारे यांनी त्यावेळी देखील पक्षांतरचाच्या चर्चा नाकरल्या होत्या.

इतर बातम्या:

Video: देश शोकसागरात, भाजप आयटी सेलकडून प्रियंका गांधींच्या ‘डान्स’चा व्हिडीओ ट्विट, काँग्रेसचेही जशास तसे उत्तर

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद

Sanjay Savkare birthday wishes banner posted by supporters missing big bjp leaders

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.