तर भाजप सत्तेत नसतं… CM फडणवीस आणि ठाकरे बंधूंच्या भेटीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असतानाच संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांनी भाजपला सुनावलं आहे. काय म्हटलंय संजय शिरसाटांनी?

तर भाजप सत्तेत नसतं... CM फडणवीस आणि ठाकरे बंधूंच्या भेटीवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Shivsena
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 4:18 PM

ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल 29 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका अराजकीय व्यासपीठावर एकत्र आले होते. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आधीच विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरुन भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील युतीत बिघाड झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर आता कालच्या या घटनेनंतर वातावरण आणखी बदलले आहे. याच भेटीवर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिंदे सेनेकडून पहिली प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री आणि प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिली आहे.

ठाकरे बंधू आणि फडणवीस आले म्हणून नवी राजकिय समिकरणं ऊदयास येतील हे चुकीचं. नेते एकमेकांना भेटत असतात. आशिष शेलार यांचं राज ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालंय का हे पाहणं महत्वाचं, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

दरम्यान याचवेळी त्यांनी २०१९ नंतर जे काही घडलं, त्यामुळे आम्ही ऊठाव केला, हा ऊठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती, असं मतही शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मांडलं आहे. ते आज मीडियाशी बोलत होते.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पातळी पाहून टिका करावी, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्या बोलण्याला देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का असा सवाल आम्हीही ऊपस्थित करू शकतो, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. याशिवाय पुढील तीन महिन्यात मोठ्या घडामोडी राज्यात होतील, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बरीच चर्चा सुरू आहे. ते काॅमन मॅन आहेत, असंही त्यांनी सांगितलं, त्यामुळे आता राजकीय पट पुन्हा शिंदेंच्या बाजूने जाणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

पुर्णेकर हत्याकांडात शिंदेंना टार्गेट केलं जातंय, ते ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे त्यांना यश येणार नाही. आमच्यात कोणतीच धुसफुस नाही, सगळं काही आलबेल, असल्याचा दावाही मंत्री शिरसाटांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us