सांगलीतून भाजपची उमेदवारी जाहीर, संजयकाका म्हणतात…

सांगलीतून भाजपची उमेदवारी जाहीर, संजयकाका म्हणतात...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 16 उमेदवारांची घोषणा झाली असून, पहिल्याच यादीत सांगलीचे भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. पुन्हा एकदा आपण विक्रमी मतांनी जिंकून येणार, असा विश्वास संजयकाका पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्यातून विक्रमी उच्चांकी पहिल्या किंवा दुसऱ्या मताधिक्याने मी निवडून येईन. विकासाच्या मतांवर मी जिंकेन, तसेच पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी स्वत: प्रयत्न करणार आहे, असे संजयकाका पाटील ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. नुकतेच भाजपकडून देशभरातील 182 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 16 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपच्या दोन विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला. त्यात दिलीप गांधी आणि सुनिल गायकवाड यांचा समावेश आहे.

कोण आहेत संजयकाका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI