आमदार भास्कर जाधव यांना अखेर सुरक्षा, अधिवेशातील राड्यानंतर गृह खात्याचा निर्णय

| Updated on: Jul 07, 2021 | 7:50 PM

अखेर भास्कर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.

आमदार भास्कर जाधव यांना अखेर सुरक्षा, अधिवेशातील राड्यानंतर गृह खात्याचा निर्णय
आमदार भास्कर जाधव
Follow us on

मुंबई : पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. (Security to MLA Bhaskar Jadhav after chaos during monsoon session)

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसं चित्रही पाहायला मिळालं. मात्र भास्कर जाधव जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटलं. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी धमकी दिल्याचा आरोप

सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.

सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरलं

मुनगंटीवार यांच्या या विधानाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितलं. त्याला भास्कर जाधव यांनी विरोध केला. सुधीर मुनगंटीवार यांनी मला धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. कामकाजात हे वाक्य ठेवा. ते काढून टाकू नका. मुनगंटीवार यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवरच ठेवा. यांच्या राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जात आहे. त्यामुळे त्यांचं विधान रेकॉर्डवरून काढू नका, असं जाधव म्हणाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra New Ministers : राणे, पाटील, कराड आणि पवारांना मोदींच्या टीममध्ये स्थान, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

Maharashtra New Ministers: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’; नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Security to MLA Bhaskar Jadhav after chaos during monsoon session