AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra New Ministers: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’; नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

गेल्या काही वर्षांपासून राजकीय पदांपासून दूर राहिलेले भाजप नेते नारायण राणे यांची पुन्हा नवी इनिंग सुरू झाली आहे. नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (New Union Ministers from Maharashtra)

Maharashtra New Ministers: 'मै नारायण तातू राणे... ईश्वर की शपथ लेता हूँ की...'; नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
narayan rane
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 6:18 PM
Share

नवी दिल्ली: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (Cabinet Expansion: narayan rane take oath as a union minister)

आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

सर्वात आधी राणेंची शपथ

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सभागृहात प्रवेश झाल्यावर शपथविधीला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे राणेंना केंद्रात मोठं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शपथ घेणारे मंत्री

नारायण राणे सर्बानंद सोनोवाल डॉ. विरेंद्र कुमार ज्योतिरादित्य सिंधिया रामचंद्र प्रसाद सिंग अश्विनी वैष्णव पशुपती कुमार पारस किरेन रिजीजू राजकुमार सिंह हरदीप सिंह पुरी मनसुख मंडाविया भुपेन्द्र यादव पुरुषोत्तम रुपाला जी. किशन रेड्डी अनुराग सिंह ठाकूर अनुप्रिया सिंह पटेल डॉ. सत्यपाल सिंह बघेल राजीव चंद्रशेखर शोभा करंडलाजे भानूप्रताप सिंग वर्मा दर्शना विक्रम जरदोष मीनाक्षी लेखी अनपुर्णा देवी ए. नारायण स्वामी कौशल किशोर अजय भट्ट बी. एल. वर्मा अजय कुमार चौहान देवूसिंह भागवत खुपा कपिल पाटील प्रतिमा भौमिक डॉ. सुभाष सरकार डॉ. भागवत कराड डॉ. राजकुमार सिंह डॉ. भारती पवार बिस्वेश्वर तडू शंतनु ठाकूर डॉ. मुंजपारा महेंद्रभाई जॉन बरला डॉ. एल. मुरगन निसित प्रमाणिक (Cabinet Expansion: narayan rane take oath as a union minister)

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार?; वाचा, संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

Modi Cabinet Expansion: रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रेंचा राजीनामा?; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

Modi Cabinet Expansion: ठरलं! आज सायंकाळी 6 वाजता मोदी सरकारचा विस्तार, 4 मंत्र्यांचे राजीनामे, 43 नेते मंत्री म्हणून शपथ घेणार!

(Cabinet Expansion: narayan rane take oath as a union minister)

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.