Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार?; वाचा, संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात अनेक बड्या नेत्यांचा समावेश होणार आहे. चार माजी मुख्यमंत्र्यांसह राज्यांमधील दिग्गज नेत्यांना नव्या विस्तारात स्थान देण्यात येणार आहे. (Modi cabinet expansion)

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार?; वाचा, संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 3:06 PM

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात अनेक बड्या नेत्यांचा समावेश होणार आहे. चार माजी मुख्यमंत्र्यांसह राज्यांमधील दिग्गज नेत्यांना नव्या विस्तारात स्थान देण्यात येणार आहे. भाजप नेते नारायण राणेंपासून ज्योतिरादित्य सिंधियांपर्यंतचे अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. (Jyotiraditya Scindia, narayan rane and leaders can get big responsibility in Modi government cabinet)

आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे. त्यामुळे मोदींचं दुसऱ्या टर्मचं मंत्रिमंडळ जम्बो मंत्रिमंडळ असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या नेत्यांची वर्णी लागणार?

सर्वानंद सोनोवाल (आसाम) ज्योतिरादित्य सिंधिया (मध्यप्रदेश) अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश) पशुपती पारस (बिहार) मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली) अजय भट्ट (उत्तराखंड) शोभा करदंलाजे (कर्नाटक) नारायण राणे (नारायण राणे) अजय मिश्र (उत्तर प्रदेश) आरसीपी सिंह (बिहार) भूपेंद्र यादव (राजस्थान) कपिल पाटिल (महाराष्ट्र) बीएल वर्मा (उत्तर प्रदेश) अश्ववनी वैष्णव (ओडिशा) शांतनु ठाकूर(बंगाल)

शपथविधी पूर्वी चार मंत्र्यांचे राजीनामे

दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे.

ओबीसींचा वरचष्मा

नव्या विस्तारात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. मुस्लिम, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजातील प्रत्येकी एका नेत्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. तसेच 27 ओबीसी नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यापैकी 5 जण कॅबिनेट मंत्री असतील. त्यासिवाय अनुसूचित जनजातीच्या 8 नेत्यांचा समावेश करण्यात येणार असून यातील तिघांना कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. नव्या मंत्रिमंडळात अनुसूचित जातीच्या 12 नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यापैकी दोघांना कॅबिनेटमंत्रीपदी घेण्यात येणार आहे. (Jyotiraditya Scindia, narayan rane and leaders can get big responsibility in Modi government cabinet)

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Expansion LIVE Updates : पीएम मोदींच्या निवासस्थानावरील बैठक संपली, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांचा राजीनामा

असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण

(Jyotiraditya Scindia, narayan rane and leaders can get big responsibility in Modi government cabinet)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.