Maharashtra New Ministers : राणे, पाटील, कराड आणि पवारांना मोदींच्या टीममध्ये स्थान, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या चौघांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देण्यामागे आगामी महापालिका निवडणुकाांसह जातीय समिकरणाचाही विचार करण्यात आल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

Maharashtra New Ministers : राणे, पाटील, कराड आणि पवारांना मोदींच्या टीममध्ये स्थान, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?
नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 7:28 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. यात महाराष्ट्रातील 4 खासदारांना केंद्रीय मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. त्यात खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या चौघांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देण्यामागे आगामी महापालिका निवडणुकाांसह जातीय समिकरणाचाही विचार करण्यात आल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. (Why Narayan Rane, Kapil Patil, Bhagwat Karad, Bharti Pawar in the Union Cabinet?)

कपिल पाटील –

येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपच्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं समजतं. खासदार कपिल पाटील यांचा विचार करता ठाण्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठामपणे उभी आहे. मात्र, कपिल पाटील यांना मोठे अधिकार दिल्यास एक नेतृत्व तयार होण्यास मदत होईल. तसंच येणाऱ्या निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होईल. यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचं आल्याचं मत लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी व्यक्त केलंय.

नारायण राणे –

दुसरीकडे कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा अधिक प्रसार करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला जोरदार राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत शिवसेनेला जोरदार उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं प्रधान म्हणाले.

भागवत कराड –

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशावेळी भागवत कराड यांनी संधी देण्याचं काम भाजपनं केलंय. भागवत कराड हे मराठवाड्यातील ओबीसीचे मोठे नेते आहेत. सध्या ओबीसी आरक्षण याचा विचार केल्यास ओबीसी नेत्यांना सोबत ठेवण्याचा काम भाजपने केलंय. तसंच भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यानं मराठवाड्यात भाजपाची ताकद वाढणार असल्याचंही ते म्हणाले.

भारती पवार –

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यात 11 महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे. भारती पवार या सुशिक्षित महिला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे भाजप सरकारमध्ये महिलांना योग्य स्थान दिलं जातं असा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचं प्रधान म्हणाले.

इतकंच नाही तर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेले महाराष्ट्रातील चारही नेते इतर पक्षातून भाजपात आलेले आहेत. त्यामुळे इतर पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांचाही विचार केला जातो आणि त्यांनाही मंत्रीपद दिलं जातं असा सूचक संदेश देण्याचे काम या माध्यमातून करण्यात आल्याचं संदीप प्रधान म्हणाले.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle : ‘हे येरागबाळ्याचं काम नाही’, नारायण राणेंच्या शपथविधीनंतर राणे पुत्रांची पहिली प्रतिक्रिया

चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी भागवत कराडांना? योगा योग की मुंडे भगिनींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर

Why Narayan Rane, Kapil Patil, Bhagwat Karad, Bharti Pawar in the Union Cabinet?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.