चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी भागवत कराडांना? योगा योग की मुंडे भगिनींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर

ज्या समाजाच्या जोरावर मुंडे भगिनी राजकारण करतायत त्यांच्या एकट्या त्याच नेत्या नसून इतरही आहेत हा संदेश पक्षच देत असल्याचं दिसतंय. त्यात काही वावगही नाही. उलट नवं नेतृत्व उभं राहतंय हे भाजपसाठी चांगलंच आहे.

चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी भागवत कराडांना? योगा योग की मुंडे भगिनींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर
Munde sisters Vs karad card
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 07, 2021 | 6:06 PM

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची (Modi cabinet expansion) जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण फक्त कुणी तरी घरी गेलंय आणि त्याची जागा भरली जातेय एवढच त्यात गणित दिसत नाहीय. यात अनेक मातब्बरांना नारळ देण्यात आलंय तर आपल्याला लॉटरी लागणारच असं गृहीत धरणाऱ्यांना घेतलेलच नाही. महाराष्ट्रातून नारायण राणे, (Narayan rane) कपिल पाटील (Kapil patil), भागवत कराड(Bhagwat karad) आणि भारती पवार(Bharti Pawar) हे चौघे जण मंत्री म्हणून शपथ घेतायत. यातलं सर्वांना धक्का देणारं नाव आहे. भागवत कराड यांचं.

कारण चर्चा प्रीतम मुंडेंच्या नावाची होती आणि लॉटरी मात्र भागवत कराडांना लागलीय. प्रीतम मुंडे आणि भागवत कराड दोन्ही ओबीसी, वंजारी समाजातून येतात. मंत्रिपद कुणाला द्यायचं म्हटलं तर थेट चर्चा प्रीतम मुंडेंचीच होते, झालीय. त्याला दोन कारणं. पहिलं गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि दुसरं पंकजा मुंडे. त्यातही पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी दिली जाईल अशी यावेळेस तरी जोरदार चर्चा होती पण ही पुन्हा फक्त चर्चाच ठरलीय. उलट प्रीतमला डावलून भागवत कराडांना मंत्री केल्यामुळे मुंडे भगिनी आणखी दुखावल्या जातील अशीच आता चर्चा आहे. कारण वंजारी समाज म्हणजे फक्त मुंडे भगिनींची मक्तेदारी नाही असा तर संदेश भाजपालाच त्यांना द्यायचा नसेल ना? अशीही चर्चा आहे.

चर्चा पंकजांची, लॉटरी रमेश कराडांना पंकजा मुंडेंचा विधानसभेला पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधानसपरिषदेच्या निवडणुका होत्या. गोपीचंद पडळकर, रमेश कराड यांना भाजपनं आमदार केलं. त्याच वेळेस पंकजा मुंडेंनाही विधानपरिषदेवर घेतलं जाणार याची चर्चा जोरदार रंगली. पण त्यावेळेस बाजी मारली ती रमेश कराड यांनी. तेही वंजारी समाजातूनच येतात. म्हणजे चर्चा झाली ती पंकजा मुंडेंच्या नावाची पण लॉटरी लागली रमेश कराड यांना. तेच आमदार झाले. बरं ते राष्ट्रवादीत जाऊन परत आले, पडळकरांनी तर भाजपलाच भलं बुरं म्हटलेलं. त्यांना आमदार होता आलं पण पंकजा मुंडेंचा नंबर कटला तो कटलाच.

आता चर्चा प्रीतमची, लॉटरी भागवत कराडांना भागवत कराड हे औरंगाबादचे दोनदा महापौर झाले. गोपीनाथ मुंडेंचे ते खंदे समर्थक राहीले. त्यांच्याच आशीर्वादानं कराड राजकारणात आले. त्यांना पदही मिळत गेली. पंकजा मुंडे यांची नाराजी घालण्यासाठीच भागवत कराडांना राज्यसभेवर खासदार केल्याची चर्चा झाली. प्रत्यक्षात त्यांना शह देण्यासाठी त्यांची निवड झाली असही राजकारण रंगलं. आता तर प्रीतम मुंडेंऐवजी भाजपानं भागवत कराडांना संधी देऊन मुंडे भगिनींना वेटींगवरच ठेवलेलं दिसतंय.

मुंडेंऐवजी कराडांना संधी का? राष्ट्रवादीनं राज्यात ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिलीय. त्यातल्या त्यात वंजारी समाजातून येणाऱ्या धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड ही नेतेमंडळी कॅबिनेटमध्ये आहेत. पंकजांच्या पराभवानंतर भाजपात वंजारी नेत्यांना स्थान दिलं जात नसल्याची ओरड सुर झाली. त्यानंतरच आधी रमेश कराडांना संधी दिली आणि आता भागवत कराडांना थेट मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान.

यातून एक संदेश स्पष्ट आहे. ज्या समाजाच्या जोरावर मुंडे भगिनी राजकारण करतायत त्यांच्या त्या

एकट्याच नेत्या नसून इतरही आहेत हा संदेश पक्षच देत असल्याचं दिसतंय. त्यात काही वावगही नाही.

उलट नवं नेतृत्व उभं राहतंय हे भाजपसाठी चांगलंच आहे. पण मुंडे भगिनींचं हे खच्चीकरण तर केलं जात

नाही ना अशी चर्चा करण्यास नक्कीच वाव आहे.

कोण आहेत भागवत कराड? भागवत कराड आणि रमेश कराड हे खासदार-आमदार दोघेही लातूर जिल्ह्यातले. भागवत कराड हे अहमदपूर तालुक्यातल्या चिखली गावचे आहेत. ते बालरोग तज्ञ म्हणून ते औरंगाबादला परिचीत आहेत. त्यांचं वैद्यकिय शिक्षण हे औरंगाबादलाच झालं. घरची स्थिती हलाखीचीच होती. औरंगाबादला ते आधी नगरसेवक नंतर पक्षाचे पालिका गटनेते, नंतर दोन वेळा महापौर, नंतर खासदार आणि आता मंत्री असा त्यांचा प्रवास आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें