
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकताच निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. लातूरच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल कळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी ताकद लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसची शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून होती.
राज्यपाल आणि अनेक मंत्रिपदे त्यांनी भूषवली आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने मोठा धक्का लोकांना बसलाय. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. मागील काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते राजकारणात फार जास्त सक्रिय नव्हते. मात्र, कॉंग्रेससाठी ते नक्कीच मोठी ताकद लातूर जिल्ह्यात होते.
मराठवाड्यातील आणि देशातील राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर लातूर नगरपालिकेच्या राजकारणातून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली.
1963 मध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजया पाटील यांच्याशी विवाह केला. एक मुलगा आणि एक मुलगी शिवराज पाटील चाकूरकर यांना आहे. हेच नाही तर शिवराज पाटील यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहेत. मोठा परिवार शिवराज पाटील चाकूरकर यांचा आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.