मोठी बातमी! अजित पवार गटात रात्रीतून घडामोडींना वेग, बडे नेते नाराज, मोठं काही तरी घडणार?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चर्चेला उधान आलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चर्चेला उधान आलं आहे. या भेटीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांच्याबद्दल तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांना डावलून संपूर्ण पक्षाचा कारभार सुरू आहे त्यामुळे पक्षातील सर्व नेते नाराज आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष या पदाच्या निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलल होतं, त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये डावललं जात असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
अर्थखात्यावर देखील चर्चा
दरम्यान या भेटीवेळी अमित शाह यांच्यासोबत राज्यातील अर्थमंत्रिपदाबाबत देखील चर्चा झाली आहे. पूर्वी राष्ट्रवादीकडे असलेलं अर्थमंत्रिपद सध्या भाजपकडे आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळावं यावर देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार निर्णय प्रक्रियेमध्ये डावलं जात असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती देखील समोर आली आहे, त्यामुळे आता पुढील काळात काय घडणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
