Sharad Pawar : ब्राह्मण महासंघाने शरद पवारांची भेट नाकारली, मिटकरींच्या विधानाचे गंभीर पडसाद

Sharad Pawar : ब्राह्मण महासंघाने शरद पवारांची भेट नाकारली, मिटकरींच्या विधानाचे गंभीर पडसाद
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: TV9

राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांच्या विधानाचे गंभीर पडसाद उमटताना दिसत आहेत. शरद पवारांनी ब्राह्मण महासंघाला भेटीसाठी आमंत्रण दिले होते. उद्या संध्याकाळी ब्राह्मण संस्थाना भेटीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी ही भेट नाकारत मोठा धक्का दिला आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 20, 2022 | 6:59 PM

पुणे : राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation) शरद पवारांची (Sharad Pawar) भेट नाकारली आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांच्या विधानाचे गंभीर पडसाद उमटताना दिसत आहेत. शरद पवारांनी ब्राह्मण महासंघाला भेटीसाठी आमंत्रण दिले होते. उद्या संध्याकाळी ब्राह्मण संस्थाना भेटीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी ही भेट नाकारत मोठा धक्का दिला आहे. तसेच शरद पवारांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची ब्राम्हण संस्थांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू होता. लग्न लागताना होणारे मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतरच हा वाद पेटला आहे.

मिटकरींचं विधान काय होतं?

सांगलीच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होतं.  कन्या हा दान करण्याचा विषय नाहीये, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र कन्यादानावेळी सांगितलेल्या मंत्राचा अर्थ मी सांगितला होता, असं मिटकरींनी म्हटलंय. तसंच संस्कृतचा मी जाणकार आहे. अभ्यासक आहे. मला जर कोणते प्रश्न कळले नाही, तर त्याची उत्तर मी जाणकारांकडून समजून घेईन, असंही मिटकरींनी त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते. त्यावरूनच हा वाद चांगलचा उफळला आहे.

ब्राम्हण महासंघाची प्रतिक्रिया काय?

ज्यावेळी अमोल मिटकरी यांनी हे विधान केले त्यावेळी आम्ही शरद पवारांना हे असले राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे असे कळवलं होतं. मात्र त्यानंतरही छगन भुजबळ यांनी पवारांच्या उपस्थितीत ज्योतिष, पुरोहित हे धंदा करतात, असा शब्द वापरला. त्यांना व्यवसाय हा शब्द वापरता आला असता मात्र तोही नाही वापरला. मंदिराचं सर्व यांच्याकडे आहे, असे खोटं पसरवलं. त्यानंतर पवारांनी बोलताना काही अशीच उदाहरण दिली. आणि भुजबळ आणि अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. त्यामुळे आता त्याच्यासोबत बोलण्यासारखं काही उरलं नाही. आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमचं मत पवारांसमोर मांडा. मात्र ते पवारांना आणि राष्ट्रवादीला माहिती आहे. मग पुन्हा पुन्हा बोलणं योग्य नाही. त्यामुळे यावर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर आम्ही पवारांना निश्चित भेटू असे ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें