चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे : शरद पवार

जगात काय चाललंय तिकडं लक्ष असलं पाहिजे, चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे, हे सगळं करत असताना मूळ धंदा व्यवस्थित करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे : शरद पवार

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Karad tour) हे आज कराड दौऱ्यावर होते. माजी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवारांनी प्रीतीसंगमावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar Karad tour) हस्ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा  शुभारंभ झाला.

यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. “ऊस उत्पादक शेतकरी उसावर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी बाकीच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करतो ही चांगली गोष्ट आहे.  मुंबईला काय चाललं आहे कोण राहिला, कोण पळाला याची अखंड चर्चा सुरू असते. मात्र माझं ऊस टन उत्पादन वाढेल याची चर्चा करत नाही चर्चा दुसऱ्या विषयाचे होते”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

जगात काय चाललंय तिकडं लक्ष असलं पाहिजे, चुकीला चुकीचं म्हटलं पाहिजे, हे सगळं करत असताना मूळ धंदा व्यवस्थित करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

शेतकऱ्याच्या एका मुलाने शेती, दुसऱ्याने उद्योग करावा

शेतीत संशोधन गरजेचं आहे, ऊस जात पीक, औजारे यामध्ये संशोधन सुरु आहे, उत्पादनाबरोबर अधिक किंमतीसाठी अभ्यास गरजेचा आहे.  शेतकऱ्यांच्या शेती सर्व मुलांनी न करता, एकाने शेती करावी, तर दुसऱ्या मुलानं उद्योग किंवा इतर क्षेत्रात जावं, आता जमीन कमी होत आहे, लोकसंख्या वाढली आहे, शेतीजमीन कमी होते आहे, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

मी अधिक बोलण्यासाठी उभा नाही, माझी खूप बोलायची इच्छा आहे पण मुंबईत लोक माझी वाट पाहत आहे. त्यामुळं लवकर जायचं आहे. बाकीचं सगळं नीट करायचा आहे, ते नी नेटकं होईल. एकदा नीटनेटकं झाल्यानंतर जे काही घडेल ते घडेल, असं पवार म्हणाले.

अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही : शरद पवार

भाजपला पाठिंबा देण्यामागे स्वतः शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोपही यापैकीच एक (Sharad Pawar on allegations of supporting BJP). याविषयी विचारले असता शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, “माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मी काही मुद्दे पटवून दिले तर ते माझं म्हणणं नाकारतात असा माझा अनुभव नाही. मला जर भाजपला पाठिंबा द्यायचा असता तर मी त्यांना सांगून पाठिंबा देऊ शकलो असतो. त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यात माझा हात आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.”

संबंधित बातम्या  

भाजपला पाठिंबा देण्यामागे तुमचा हात? शरद पवार म्हणतात… 

Published On - 2:37 pm, Mon, 25 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI