AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown 4 | रणनीती ठरवण्यासाठी शरद पवारही मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, रिक्त पदांबाबतही चर्चा

मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

Lockdown 4 | रणनीती ठरवण्यासाठी शरद पवारही मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, रिक्त पदांबाबतही चर्चा
| Updated on: May 15, 2020 | 5:49 PM
Share

मुंबई : लॉकडाऊन 4 संबंधी रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. (Sharad Pawar meeting with Uddhav Thackeray) कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीत लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे आणि रिक्त पदे भरणे याबाबत चर्चा झाली. (Sharad Pawar meeting with Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर इथे ही बैठक बोलावली होती. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत असून केंद्र शासन कशा स्वरुपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या सुमारे 55 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा आजच्या बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशारितीने मुकाबला करीत आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

वाचा : Lockdown 4 | मोदींकडून लॉकडाऊन 4 ची घोषणा, ठाकरे सरकारकडून रणनीती आखण्यास सुरुवात

राज्यात 20 एप्रिलनंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग-व्यवसाय सुरु करण्यात आले होते. 65 हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून 35 हजार उद्योग सुरु झाले आहेत, तसेच 9 लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर 50 टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली.

रिक्त पदे भरण्याबाबतही चर्चा

दरम्यान या बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची याबाबत मंथन झालं

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पावले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरुपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.

शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पैकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली.

संबंधित बातम्या 

Lockdown : 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.