शरद पवार माळशिरसमधील निष्ठावंताच्या घरी, भालचंद्र पाटलांच्या निधनानंतर कुटुंबाची सांत्वन भेट

भालचंद्र पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यातील कान्हेरमधील घरी जाऊन रमेश पाटील यांची भेट घेतली

शरद पवार माळशिरसमधील निष्ठावंताच्या घरी, भालचंद्र पाटलांच्या निधनानंतर कुटुंबाची सांत्वन भेट

सोलापूर : राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते भालचंद्र पाटील यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माळशिरसमध्ये जाऊन पाटील कुटुंबाची भेट घेतली. भालचंद्र पाटील यांचे पुत्र रमेश पाटील यांना भेटून पवारांनी सांत्वन केले. पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. (Sharad Pawar meets NCP supporter Ramesh Patil after Father’s Demise)

शरद पवार माळशिरस तालुक्यातील कान्हेरमध्ये रमेश पाटील यांच्या घरी गेले होते. रमेश पाटील यांचे वडील भालचंद्र पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पवारांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. भालचंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

शरद पवार यांना गेली अनेक वर्ष साथ देणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा तालुका म्हणून माळशिरसची ओळख आहे. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवारांनी माळशिरस तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

हेही वाचा : कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन

शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

शरद पवार हे सोलापूरमधील ‘कोरोना’च्या परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारी आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

याआधी, कोरोनामुळे निधन झालेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार गेले होते. पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. (Sharad Pawar meets NCP supporter Ramesh Patil after Father’s Demise)

Published On - 12:38 pm, Sun, 19 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI