कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांवर शरद पवार यांचं भाष्य, आधीच्या राज्यपालांचा दिला दाखला…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पुन्हा एकदा भाष्य केलंय.

कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांवर शरद पवार यांचं भाष्य, आधीच्या राज्यपालांचा दिला दाखला...
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 9:53 AM

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आता बरेच दिवस लोटलेत. पण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आजही पाहायला मिळत आहेत. अशात कोश्यारी यांनी काल पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. विरोधक त्यावर टीकाकरताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज या वादावर पुन्हा एकदा भाष्य केलंय. त्यांनी कोश्यारी यांच्या विधानावर टीका केलीय.  ते कोल्हापुरात बोलत होते.

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखावी. आधीचे राज्यपाल चांगले होते. आताचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात, असं म्हणत शरद पवार यांनी कोश्यारींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषण करत होते. भाषण सुरु होताच एका महिलेने उभं राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवलं.‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असं म्हणत आपली अडचण सांगितली. महिलेच्या बोलण्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला उत्तर दिलं. ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो!’ असं कोश्यारी म्हणाले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे.

जातीयवादाचा विचार आमच्या मनात नाही. शाहू, फुले, आंबडेकर यांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणं फारसं चुकीचं नाही. यावरून वाद निर्माण होणं चुकीचं आहे, असंही शरद पवार म्हणालेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक विधान केलं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवारांनी म्हटलं. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय.

जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची या आधीपासून मागणी आहे. यामुळे लहान घटकांची मोजदाद होईल. नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे, असंही पवार म्हणालेत.

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.