भाजप देशावरची आपत्ती, पराभवाची मालिका सुरु : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Delhi result) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना, भाजपवर टीकास्त्र सोडलं.

Sharad Pawar on Delhi result, भाजप देशावरची आपत्ती, पराभवाची मालिका सुरु : शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Delhi result) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना, भाजपवर टीकास्त्र सोडलं. “हा जो निवडणुकीचा निकाल लागला त्याचं मला आश्चर्य वाटलं नाही. दैनंदिन गोष्टींचे प्रश्न सोडवले, असं महिलांचं मत होतं. दिल्ली शहर हे देशातील अन्य शहरांपेक्षा वेगळ आहे. हा निर्णय दिल्लीपुरता सीमित नाही. इतर राज्यातही बदलाचं वातावरण आहे. त्याचे परिमाण इथं दिसले”, असं पवार म्हणाले. (Sharad Pawar on Delhi result)

“अहंकार फार होता. संसदेच्या सदस्यांमध्येही दहशत आहे, ती नाराजी इथं पाहायला मिळाली. पराभवाची मालिका सुरु झाली. आता आमची जबाबदारी वाढली आहे. भाजपने धार्मिक कटुता वाढवली. जाणीवपूर्वक हे केलं. लोकांनी हे स्वीकारले नाही. हा पराभव होणारच होता. भाजपही देशावरची आपत्ती आहे”, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

इथून पुढे किमान समान कार्यक्रम हाती घेऊन काम करणं गरजेचं आहे. देशात आम्ही सर्वजण एकत्र बसून काम करू. आज लोकांना एका विचाराची, कार्यक्रमाची अपेक्षा आहे. भाजप ही देशावरची आपत्ती आहे, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांना मनसेच्या मोर्चाबाबत विचारण्यात आलं, त्यावर ते म्हणाले, “राज ठाकरेंचं म्हणणं फार गांभीर्याने घेणं गरजेच नाही. काही लोक भाषण ऐकायला येतात, काही पाहायला येतात” असा टोला पवारांनी लगावला.

दिल्ली विधानसभा निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.  दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 60 जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे  निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. (Delhi Vidhansabha Election Result)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *