Dhananjay Munde Case : म्हणून धनंजय मुंडेंवरील आरोप ‘गंभीर’ असल्याचं म्हणालो, शरद पवारांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jan 15, 2021 | 2:30 PM

एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला, आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं" असं पवारांनी सांगितलं. Sharad Pawar on Dhananjay Munde Renu Sharma Case:

Dhananjay Munde Case : म्हणून धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर असल्याचं म्हणालो, शरद पवारांचं स्पष्टीकरण
नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते.
Follow us on

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपांप्रकरणी सर्व माहिती घेतली आहे, पक्षातील सर्व सहकाऱ्यांशी सविस्तर विचार विनिमय केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याची आमची भूमिका आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं. महिलेने आरोप केल्यामुळे गंभीर हा शब्द वापरल्याचं पवारांनी सांगितलं. धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर असल्याचं वक्तव्य पवारांनी केल्यामुळे कारवाई होण्याचे संकेत मानले जात होते. (Sharad Pawar talks on Dhananjay Munde Renu Sharma alleged Rape Case)

“धनंजय मुंडेंवरील आरोपांवर कालच सांगितलं की, प्रश्न गंभीर आहे. तक्रारीचं स्वरुप गंभीर आहे, सर्व मिळून निर्णय घेऊ. त्याची माहिती घेतली. काल सविस्तर विचार विनिमय केलं. तक्रार महिलेने केल्यामुळे गांभीर्याने घेतली. ही तक्रार आल्यानंतर मीडियातून आणखी नवीन गोष्टी समोर आल्या. ब्लॅकमेल केलं जाईल, अशी पूर्वकल्पना असल्याने धनंजय मुंडे कोर्टात गेले होते. त्याची कागदपत्रेही त्यांनी मला दाखवली. व्यक्ती स्वतःहून कोर्टात जाते, त्यामुळे त्यावर विश्वास असावा. कोर्टात प्रकरण असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही” असं पवारांनी स्पष्ट केलं.

“एकामागून एक तिघांचे आरोप”

“मीडियातून बातमी आली, याच महिलेने एका व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या एका माजी विधानसभा सदस्याची ही तक्रार होती. ती माहिती घेत असताना आणखी एका व्यक्तीची माहिती आली, नंतर विमान कंपनीतील अधिकाऱ्याची माहिती आली. मुंडेंवर आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात तीन व्यक्तींची माहिती आली. पाच-दहा वर्षांपूर्वी त्रास दिल्याचं, आरोप केल्याचं समजलं. हे सर्व समोर आल्यावर त्याची चौकशी सखोल झाली पाहिजे या निष्कर्षावर आम्ही आलो” असं शरद पवार म्हणाले.

“…म्हणून गंभीर हा शब्द वापरला”

“पोलीस विभाग चौकशी करेल. आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. धनंजय मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे प्रकरण नेमकं प्रकरण आणावं. काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्र समोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला, आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं” असं पवारांनी सांगितलं.

“आरोप करुन सत्तेपासून दूर करण्याची प्रथा नको”

“धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबद्दलच एकापेक्षा अधिक गोष्टी समोर आल्यानंतर त्यातील सत्यता तपासली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हायला लावायचे, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी” अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या. (Sharad Pawar talks on Dhananjay Munde Renu Sharma alleged Rape Case)

तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही

ही एक-दोन उदाहरणं आली नसती, तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणं आल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलीस तपास करतील, आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांचा भाजपला टोला

शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टीही झाल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्या बाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत, असा टोलाही पवारांनी लगावला.


संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा

(Sharad Pawar talks on Dhananjay Munde Renu Sharma alleged Rape Case)