Dhananjay Munde Case : हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा

Dhananjay Munde Renu Sharma Case : मी कुणालाही फसवलं नसून, कृष्णा हेगडे यांनीच मला बोलण्याचा प्रयत्न केल्याचं रेणू शर्मा यांनी म्हटलंय.

Dhananjay Munde Case : हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा
कृष्णा हेगडे यांनी केलेले सर्व आरोप रेणू शर्मा यांनी फेटाळले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 12:00 PM

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी मला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, मी कुणालाही फसवलं नसून, कृष्णा हेगडे यांनीच मला बोलण्याचा प्रयत्न केल्याचं रेणू शर्मा यांनी म्हटलंय. “मी हनी ट्रॅपच्या कुठल्याही प्रकारमध्ये सहभागी नाही. मी कुणालाही फसवलं नाही. उलट भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ते मला भेटले,” असा खुलासा रेणू शर्मा यांनी केला आहे. (Renu Sharma claims that Krishna Hegde met her at Pratap Sarnaiks birthday party tried to talk her)

गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्माने मला रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला.

हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सहभागी नाही

हेगडेंच्या या आरोपानंतर रेणू शर्मा यांनी खरंच कृष्णा हेगडे यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला का?, असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर शर्मा यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी मी कुणालाही हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हटलंय. “माझ्यावर हनी ट्रॅपचे जे आरोप करण्यात आले आहेत, ते चुकीचे आहेत. मी कोणत्याही हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सहभागी नाही. कृष्णा यांनीच माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. ते मला शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये भेटले,” असं रेणू शर्मा यांनी हेगडे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय.

कृष्णा हेगडेंचा आरोप काय ?

रेणू शर्मा यांनी रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी 14 जानेवारी रोजी केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

“मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी,” असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले होते.

संबंधित बातम्या :

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल: शरद पवार

(Renu Sharma claims that Krishna Hegde met her at Pratap Sarnaiks birthday party tried to talk her)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.