हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?

Dhananjay Munde | शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं.

हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?
शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Dhananjay Munde) यांनी अखेर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावर भाष्य केलं आहे. “पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज बैठक झाली. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं. (Sharad Pawar may take action against Dhananjay Munde)

शरद पवारांनी नवाब मलिक यांची खंबीरपणे पाठराखण केली. नवाब मलिकांच्या जावयावर आरोप आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक नाहीत, असं शरद पवार म्हणाले. तर धनंजय मुंडे यांचं प्रकरण गंभीर आहे, असं त्यांनी नमूद केलं. शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हटल्याने, धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काही प्रश्नांना हसत हसत उत्तर, काही प्रश्नांवर ठाम भूमिका

शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना काही प्रश्नांवर हसत हसत उत्तरं दिली, तर काही प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी हसत उत्तर दिलं, तुमच्याकडूनच ही माहिती मला मिळत आहे.

त्याआधी शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाचं स्वरुप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. “धनंजय मुंडेंवरचा आरोप आणि स्वरुप – माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ”, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं नंतर बघू, आधी आम्ही निर्णय घेऊ

यावेळी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे असंही विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी रोखठोक भाष्य केलं. मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाच्या स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील, असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एक प्रकारचा आदेश होता, त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही, असं शरद पवार म्हणाले.

तिसरा मुद्दा धनंजय मुंडेंवरचा आरोप आणि स्वरुप – माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावे लागतील. त्यामध्ये कुणावर अन्यायही होणार नाही हे पाहावे लागेल, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांचा माध्यमांशी संवाद

(Sharad Pawar may take action against Dhananjay Munde)

Published On - 2:37 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI