AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान, दिल्लीत असूनही शपथविधीकडे पाठ

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक जणांना वगळण्यात आलंय. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनाही राज्यमंत्री पद देण्यात आलंय. […]

शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान, दिल्लीत असूनही शपथविधीकडे पाठ
| Edited By: | Updated on: May 30, 2019 | 10:26 PM
Share

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक जणांना वगळण्यात आलंय. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनाही राज्यमंत्री पद देण्यात आलंय. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधीसाठी दिग्गजांची उपस्थिती होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र दिल्लीत असूनही या सोहळ्याकडे पाठ फिरवली.

शरद पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांना पाचव्या रांगेत स्थान होतं. कदाचित यामुळेच पवारांनी जाणं टाळलं असावं, असं बोललं जातंय. मोदींचा शपथविधी सोहळा चालू असताना शरद पवार दिल्ली विमानतळावर होते. दिल्लीत असूनही पवारांनी शपथविधी सोहळ्याला जाणं टाळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली.

या मंत्र्यांचा शपधविधी :

  1. राजनाथ सिंह (भाजप)
  2. अमित शाह (भाजप)
  3. नितीन गडकरी (भाजप)
  4. सदानंद गौडा (भाजप)
  5. निर्मला सीतारमण (भाजप)
  6. रामविलास पासवान (लोजप)
  7. नरेंद्र सिंह तोमर (भाजप)
  8. रविशंकर प्रसाद (भाजप)
  9. हरसिमरत कौर (शिअद)
  10. थावरचंद गहलोत (भाजप)
  11. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर (भाजप)
  12. रमेश पोखरियाल निशंक (भाजप)
  13. अर्जुन मुंडा (भाजप)
  14. स्मृती इराणी (भाजप)
  15. डॉ. हर्षवर्धन (भाजप)
  16. प्रकाश जावडेकर (भाजप)
  17. पियुष गोयल (भाजप)
  18. धर्मेंद्र प्रधान (भाजप)
  19. मुख्तार अब्बास नकवी (भाजप)
  20. प्रल्हाद जोशी (भाजप)
  21. डॉ. महेंद्रनाथ पांडे (भाजप)
  22. अरविंद सावंत (शिवसेना)
  23. गिरिराज सिंह (भाजप)
  24. गजेंद्र सिंह शेखावत (भाजप)
  25. संतोष गंगवार (भाजप)
  26. राव इंद्रजित सिंह (भाजप)
  27. श्रीपाद नाईक (भाजप)
  28. डॉ. जितेंद्र सिंह (भाजप)
  29. किरण रिजिजू (भाजप)
  30. प्रल्हाद सिंह पटेल (भाजप)
  31. राजकुमार सिंह (भाजप)
  32. हरदीप सिंह पुरी (भाजप)
  33. मनसुख मांडविया (भाजप)
  34. फग्गन सिंह कुलस्ते (भाजप)
  35. अश्विनी कुमार चौबे (भाजप)
  36. अर्जुन राम मेघवाल (भाजप)
  37. व्ही. के. सिंह (भाजप)
  38. कृष्णपाल गुर्जर (भाजप)
  39. रावसाहेब दानवे (भाजप)
  40. गंगापुरम किशन रेड्डी (भाजप)
  41. पुरुषोत्तम रुपाला (भाजप)
  42. रामदास आठवले (भारिप-आठवले गट)
  43. साध्वी निरंजन ज्योती (भाजप)
  44. बाबुल सुप्रियो (भाजप)
  45. डॉ. संजीव कुमार बालियान (भाजप)
  46. संजय धोत्रे (भाजप)
  47. अनुराग ठाकूर (भाजप)
  48. सुरेश अंगाडी (भाजप)
  49. नित्यानंद राय (भाजप)
  50. रतनलाल कटारिया (भाजप)
  51. व्ही. मुरलीधरन (भाजप)
  52. रेणुका सिंह सरुता (भाजप)
  53. सोम प्रकाश (भाजप)
  54. रामेश्वर तेली (भाजप)
  55. प्रतापचंद्र सारंगी (भाजप)
  56. कैलाश चौधरी (भाजप)
  57. देवश्री चौधरी (भाजप)
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.