Circus remark | पवार म्हणाले आमच्याकडे विदुषकाची कमतरता, चंद्रकांत पाटील म्हणतात…..

| Updated on: Jun 10, 2020 | 2:27 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राजनाथ सिंहांना उत्तर दिल्यानंतर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. (Maharashtra politics circus remark)

Circus remark | पवार म्हणाले आमच्याकडे विदुषकाची कमतरता, चंद्रकांत पाटील म्हणतात.....
Follow us on

कोल्हापूर : महाराष्ट्रात राजकीय सर्कसवरुन तापलेलं राजकारण अद्याप सुरुच आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील सरकार आहे की सर्कस असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राजनाथ सिंहांना उत्तर दिल्यानंतर, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. (Maharashtra politics circus remark)

“महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवार यांनी मान्य केलं. त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहे हे देखील त्यांनी मान्य केलं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राजनाथ सिंहांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी, आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, फक्त विदुषकाची गरज आहे, असं म्हटलं होतं. त्याबाबत चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राजनाथ सिंहांनी जे म्हटलं त्यावर पवारांनी विदुषक म्हटलं. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. एव्हढं तरी बरं की त्यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे हे मान्य केलं. जे कोणी आहेत ते प्राणी आहेत हे मान्य केलं. पवार म्हणाले आमच्याकडे सर्कस आहे, प्राणी आहेत विदुषक पाहिजे. त्यांनी एव्हढं तरी मान्य केलं”

राजनाथ सिंह काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका राजनाथ यांनी केली होती.

शरद पवार काय म्हणाले होते?

“आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत. त्याचबरोबर सर्कसमध्ये विदुषकाची कल्पना आहे. पण विदुषकाची कमी आहे”, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

नवाब मलिकांचं उत्तर

“महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल” अशा आशयाचे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

शिवसेनेचा हल्लाबोल

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शिवसेनेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Arvind Sawant on Rajnath Singh criticism of Shivsena). ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? असा प्रश्न विचारत अरविंद सावंत यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं.  शिवसेनेने आयुष्यात कोणाला धोका दिला नाही. शिवसेनेला अनेक लोकांनी धोका दिलाय. शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. असंही अरविंद सावंत म्हणाले.

(Maharashtra politics circus remark)

संबंधित बातम्या 

आमच्याकडे सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र विदुषकाची कमी, राजनाथ सिंह यांच्या टीकेवर पवारांचं प्रत्युत्तर   

रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री लोकशाही सरकारला ‘सर्कस’ म्हणतात : नवाब मलिक   

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह 

ही बाळासाहेबांचीच शिवसेना, शब्द न पाळणारी भाजपा आता वाजपेयींची राहिलीय का? : शिवसेना