AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निकालाने धक्का बसला नाही, शरद पवार यांची निकालावर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मला स्वत:ला धक्का बसेल असा मोठा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर प्रत्येक उमेदवाराची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा जो कोटा होता, त्यात काही फरक पडलेला नाही.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निकालाने धक्का बसला नाही, शरद पवार यांची निकालावर पहिली प्रतिक्रिया
राज्यसभेच्या निकालाने धक्का बसला नाही, शरद पवार यांची निकालावर पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2022 | 8:57 AM
Share

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत  (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यसभेच्या निकालाने मला स्वत:ला धक्का बसला नाही. आमच्याकडे पुरेसा कोटा होता. त्यानुसार प्रत्येक उमदेवाराला मते मिळाली आहेत. सहाव्या जागेसाठी मोठा गॅप होता. आमच्याकडे मतांची संख्या कमी होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते. तरीही सहाव्या उमेदवारांने चांगली मते घेतली, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच या निवडणुकीत अपक्षांची मते फुटली आहेत. आघाडीच्या एकाही आमदाराचं मत फुटलं नाही. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार स्थिर आहे, असा निर्वाळाही पवारांनी दिला.

राज्यसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मला स्वत:ला धक्का बसेल असा मोठा निकाल नाही. मतांची संख्या बघितली तर प्रत्येक उमेदवाराची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा जो कोटा होता, त्यात काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना ज्यादा पडलं. ते कुठून आलं ते मला ठावूक आहे. ते या आघाडीचं नाही. दुसऱ्या बाजूचं आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.

फडणवीसांना यश आलं

सहावी सीट शिवसेनेने लढवली. तिथे आमची गॅप फार होती. मतांची संख्या कमी होती. पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या भाजपकडे अधिक होती. आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी इतकी मते नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे आमदार होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला. नाही तर आघाडीच्या संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालं आहे. त्यात वेगळं काही नाही. एकंदर जो चमत्कार झाला आहे. विविध मार्गाने माणसं आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आलं हे मला मान्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

आघाडीला धोका नाही

या निकालामुळे सरकारवर काही परिणाम होणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या निकालाने सरकारवर काही परिणाम झालेला नाही. तुम्ही कॅलक्यूलेशन पाहा. सरकारला बहुमतासाठीचा आकडा आहे. त्यात काही फरक पडलेला नाही. सरकारला धक्का बसलेला नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा