मला हरामखोर, भिकारी म्हटलं, उंदीर म्हणून हिणवलं, समरजित घाटगे भावूक

समरजित घाटगे यांनी कागल विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीत आपल्याला सहकार्य करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. जरांगे पाटील याबाबत येत्या 3 तारखेला निर्णय घेणार असल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलं.

मला हरामखोर, भिकारी म्हटलं, उंदीर म्हणून हिणवलं, समरजित घाटगे भावूक
Samarjit Ghatge
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2024 | 12:47 PM

शरद पवार गटाचे कागल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माझ्याकडे लक्ष ठेवा अशी विनंती त्यांनी मनोज जरांगे यांनी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना गेल्या पाच वर्षात राजकारणात काय काय अनुभव आला याचा पाढाच वाचला. मला भिकारी, हरामखोर म्हटल्या गेलं. माझ्या कार्यकर्त्यांना उंदीर म्हणून हिणवलं गेलं, अशी भावूक प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली. समरजित घाटगे यांचा कागलमध्ये अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासोबत सामना होणार आहे.म

मनोज जरांगे पाटील यांना भेटल्यावर समरजित घाटगे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. हे इलेक्शन समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असं होतं. पण आता हे इलेक्शन महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात जनतेचं झालं आहे. जनतेनं ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. माझ्या बाजूने नेते किती आहेत माहीत नाही. पण जनता माझ्या बाजूने आहेत, असं समरजित घाटगे म्हणाले.

माझ्या संस्कारानुसारच बोलणार

या पाच वर्षात माझ्यावर बऱ्याच टीका झाल्या. मला हरामखोर बोललं गेलं, भिकारी म्हटलं गेलं, मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना उंदीर म्हणून हिणवलं गेलं. पण या गोष्टी मी वैयक्तिक घेत नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या विचाराप्रमाणेच बोलतो. मी आजही त्यांना आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असं संबोधत असतो. मला वाटतं आपण जेव्हा निष्ठा विकतो. सौदा करतो तेव्हा झोप येत नाही. तेव्हा अशी चुकीची विधान करत असतो. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी मी माझ्या संस्कृतीप्रमाणेच बोलणार आहे. येत्या काळात त्यांच्या चार कॉन्ट्रॅक्टरची सत्ता आहे. ती बाजूला करून परिवर्तन करायचं आहे. त्यांच्यावर टीका करताना मी माझ्यावर जे संस्कार आहेत त्याप्रमाणेच वागणार आहे, असा टोला त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.

जरांगेंना म्हटलं लक्ष ठेवा

मी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळेतून वेळ काढून मला भेट दिली. मी कागल विधानसभा मतदारसंघातून उभा आहे. त्यामुळे मला तुमचं सहकार्य करा. त्यासाठी मी आलोय, असं मी त्यांनी सांगितलं. जरांगे म्हणाले की, शाहू महाराजांचंही घराणं आहे. त्यांचाही मान राखला पाहिजे. त्यावर मी त्यांना फक्त तुमचं लक्ष असू द्या, अशी विनंती केली. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या 3 तारखेला त्यांची मिटिंग आहे. त्यात ते निर्णय घेणार आहेत, असंही समरजित यांनी स्पष्ट केलं.