AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026: प्यारे दोस्तो… बिड्या स्वस्त, दारु महाग! बुटांचं काय? काय स्वस्त? काय महाग? वाचा एका क्लिकवर

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये काही वस्तू महागल्या आहेत तर काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. वाचा संपूर्ण यादी..

Budget 2026: प्यारे दोस्तो... बिड्या स्वस्त, दारु महाग! बुटांचं काय? काय स्वस्त? काय महाग? वाचा एका क्लिकवर
AlcoholImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 1:16 PM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प 2026चे संसदेत वाचन केले आहे. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या याकडे सर्वांचे लक्ष होते. आता महाग झालेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच दररोज उपयोगात येणाऱ्या काही वस्तू देखील स्वस्त झाल्या आहेत. वाचा काय स्वस्त झालं आणि काय महागलं..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये बीडी स्वस्त होणार आहेत. याशिवाय बुटही स्वस्त होणार आहेत. कपड्यांची निर्यात करणेही स्वस्त होईल. बॅटरीही स्वस्त होणार असल्याची घोषणा झाली आहे.

या वस्तू होणार स्वस्त

-बीडी

-बुटं

-कपड्यांची निर्यात

-CNG

-परदेशी प्रवास

-चामड्याची निर्यात

-बायोगॅस

-ओवन ( ‘ओवन’ किंवा संबंधित वस्तू)

-बॅटरी

-७ गंभीर आजारांची औषधे

-डायबिटीजची औषधे

-मच्छिमारांसाठी निर्यात स्वस्त

-परदेशात शिक्षण घेणे

महाग होणाऱ्या वस्तू-

-दारु

-सिगारेट

-खनिजे

-स्क्रॅब

या अर्थसंकल्पातील सीमा शुल्क (कस्टम ड्यूटी) मधील कपात आणि इतर सवलतींमुळे या वस्तू आणि सेवांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांना आणि संबंधित उद्योगांना मोठी दिलासा मिळेल.

Follow Us