AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले

Stock Market Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ एक घोषणा झाली आणि शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजारात भूकंप आला. आज बजेटसाठी शेअर बाजाराचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. रविवारी सुद्धा शेअर बाजार सुरू होता. पण बाजार पत्त्यासारखा कोसळला.

Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात महाभूकंपImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 01, 2026 | 1:09 PM
Share

Stock Market Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात आज रविवारी एक घोषणा झाली आणि शेअर बाजार हा पत्त्यासारखा कोसळला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी F And O अंतर्गत STT करामध्ये वाढ केली. गेल्या बजेटमध्ये सुद्धा यात वाढ करण्यात आली होती. यावेळी यामध्ये 0.1 टक्क्यांची वाढ करण्यात आली. एसटीटी आता 0.15 टक्के करण्यात आला. त्यामुळे शेअर बाजारात महाभूकंप आला. सेन्सेक्स 2,400 अंकांनी आपटला. तर निफ्टी 700 अंकांनी चारही मुंड्या चित झाला. कॅपिटल सेक्टरमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचे व्यापारी सत्रात जवळपास 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

3 मोठी कारणं – बाजाराला का नाही आवडले बजेट

1. STT Tax करात मोठी वाढ

2. केंद्र सरकारने 12 लाख कोटीहून अधिक कर्ज घेण्याची चर्चा केली. ही बाब बाजाराला खटकली.

3. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवावी यासाठी कोणतीही नवीन घोषणा नाही

बाजारात महाभूकंप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्यांदा बजेट सादर केले. आर्थिक विकासाला गती देण्याची त्यांनी घोषणा केली. भारतीय शेअर बाजारात रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी इंट्राडे व्यापारादरम्यान अचानक आणि तीव्र घसरण आली. अर्थमंत्र्यांनी एसटीटी, स्टेट टॅक्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली. सेन्सेक्स व्यापारी सत्रात 2,400 अंकांची मोठी घसरण आली. निफ्टी 50 मध्ये जबरदस्त पडझड दिसली. व्यापारी सत्रादरम्यान निफ्टीमध्ये जवळपास 749 अंकांची घसरण दिसली. या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे व्यापारी सत्रात जवळपास 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

बाजारा पत्त्यासारखा कोसळला

आकडेवारीनुसार मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक Sensex व्यापारी सत्रादरम्यान जवळपास 2,400 अंकांपर्यंत घसरला. व्यापारी सत्रात सेन्सेक्स 79,899.42 अंकांच्या निचांकावर पोहचला. तर सकाळी सेन्सेक्स 82,388.97 अंकावर उघडला होता. तर सुरुवातीच्या सत्रात 82,726.65 अंकांची उच्चांकी झेपही सेन्सेक्सने घेतली.

तर राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी घसरण आली. आकडेवारीवर नजर टाकली असता निफ्टी 749 अंकांनी आपटला. त्यानंतर निफ्टी व्यापारी सत्रादरम्यान 24,571.75 अंकांसह निच्चांकावर पोहचला. सकाळी निफ्टी 25,333.75 अंकांवर उघडला होता. तर सकाळच्या व्यापारी सत्रात निफ्टी 25,440.90 अंकांच्या उच्चांकावर पोहचला होता.

बीएसईच्या टॉप 30 शेअर्समधील केवळ 3 शेअर तेजीत होते. तर 27 शेअरमध्ये मोठी घसरण झाली. सनफार्मा, टिसीएस आणि कोटक महिंद्रा वगळता इतर सर्व शेअरमध्ये 8 टक्क्यांची मोठी घसरण झाली. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी, बँक क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रात मोठी घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्ससुद्धा दबावात दिसून आले. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

Follow Us
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?