AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत गणेशविसर्जनाआधी राजकारण; शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदेगटाचे नेते मनसेच्या स्टेजवर

शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदेगटाचे नेते मनसेच्या स्टेजवर दिसले. शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंबईत गणेशविसर्जनाआधी राजकारण; शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदेगटाचे नेते मनसेच्या स्टेजवर
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 10, 2022 | 12:25 AM
Share

मुंबई : गणेश विसर्जना दरम्यान शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आल्याने राजकीय वातावरण तापले. अशातच मुंबईत एक राजकीय चमत्कार पाहायला मिळाला आहे.  शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदेगटाचे नेते मनसेच्या स्टेजवर दिसले. शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर(Shinde group leader Sada Saravankar) हे मनसे नेते संतोष धुरी(MNS leader Santosh Dhuri) यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिंदे गट आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत गणेशविसर्जनाआधी राजकारण सुरु झाले आहे.

गणेश विसर्जना दरम्यान दादरजवळील प्रभादेवी परिसरात प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांच्यात आमना सामना झाला. समाधान सरवणकरांकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर प्रभादेवी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

दुसरीकडे दादर परिसरात सदा सरवणकर मनसेच्या स्टेजवर दिसले. मनसे नेते संतोष धुरींसोबत सदा सरवणकर हे उपस्थित होते. या राजकीय योगायोगामुळे मनसे शिवसेना यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. गणेशोत्सवात हिंदुत्वाचा उत्साह पहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विसर्जनासाठी एकत्र आल्याचे सदा सरवणकर म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. यानंतरच शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते देत आहेत.

राज्यात भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आता शिंदे गट आणि मनसे युती होईल अशा घडामोडी राज्यात घडताना दिसत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप मनसेची नेते युती होऊ शकते अशी चर्चा आहे.

तर, दुसरीकडे हिंदुत्वावरून एकमत होत असेल तर त्यात गैर काय ? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते उपस्थित करत आहेत. मात्र, मनसे नेमकं कोणासह युती करणार? या प्रश्नाचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमधून मिळेल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी